Posts

Showing posts from November, 2022

शिवतेज सामाजिक संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी.

Image
  शिवतेज  सामाजिक संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. कराड - प्रतिनिधी. शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवतेज  सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली .येवती तालुका कराड येथील शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या वतीने विठोबाची वाडी तालुका कराड येथील झेडपी  शाळेला  रंग कामासाठी आर्थिक निधी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे .विठोबाची वाडी तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रताप भनगे यांच्या माध्यमातून  रंग दे शाळा हा उपक्रम राबवला जात आहे. याच उपक्रमाला प्रतिसाद देत सोशल मीडिया मधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याच आव्हानाला स्वीकारत शिवतेज सामाजिक विकास संस्थेचे सचिव पत्रकार ज्ञानेश्वर  शेवाळे यांनी संस्थेच्या माध्यमातून आपल्या परीने हा निधी उपलब्ध करून दिला ,रंग दे शाळेसाठी विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी  या शाळेला भेटी देऊन कौतुक केले. रंग दे  शाळेसाठी ग्रामस्थासह, विविध सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांसाठी सहकार्य केले .

शिवप्रताप दिन सोहळा उत्साहात साजरा.

Image
  शिवप्रताप दिन सोहळा गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे . शिवमय वातावरणात किल्ले प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधुन पुष्पवर्षाव. सातारा दि. 30: शिवकालीन धाडशी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी केले.        कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण केले. त्यानंतर भवानी मातेची मनोभावे मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांनी आरती केली.  छत्रपतींची मूर्ती  ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले.  यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ...

भारत विद्यामंदिर संभाजीनगर सातारा विद्यालयांमध्ये मानक ब्युरो क्लबची स्थापना.

Image
  भारत विद्यामंदिर संभाजीनगर सातारा विद्यालयांमध्ये मानक ब्युरो क्लबची स्थापना. कराड प्रतिनिधी :- (प्रविण पाटील) बीआयएस व सायन्स सेंटर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय शुक्ला सरांच्या मार्गदर्शनाखाली भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष मा. अँड.कु. सीमा दिवाकर भोरे  मॅडम यांच्या प्रेरणेने व संस्थेच्या सचिव व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुपमा दिवाकर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत विद्यामंदिर संभाजीनगर सातारा या माध्यमिक विद्यालयांमध्ये भारतीय मानक ब्युरो क्लबची स्थापना करण्यात आली. बाजारपेठेतून ग्राहक मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतात. परंतु कोणत्या वस्तूंना भारतीय मानक ब्युरोने मान्यता दिलेली आहे याचे ज्ञान मात्र ग्राहकांना फारसे नसते. या ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक उत्पादके निकृष्ठ दर्जाच्या वस्तू ग्राहकांच्या माथी मारतात. अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी व समाजात जनजागृती करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोच्यावतीने शाळास्तरावर या  ब्युरोची स्थापना करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक द्वारे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना बीआयएस के...

मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी संदीप सोरटे यांची निवड .

Image
मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी संदीप सोरटे  यांची निवड . कराड - प्रतिनिधी.     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट  यांच्या मलकापूर शहर उपाध्यक्षपदी येवती गावचे सुपुत्र संदीप सोरटे यांची निवड करण्यात आली या निवडी  राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे ,सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब होवाळ, कराड तालुका अध्यक्ष मुकुंद माने  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.  या निवडीबद्दल रामचंद्र सोरटे मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले संदीप सोरटे  यांनी सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच सामाजिक कार्य केले आहे याची दखल घेऊन त्यांना मलकापूर शहर उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली

जिल्ह्यात उच्चांकी उचल दिल्याबद्दल शेतकरी संघटनांतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार.

Image
  जिल्ह्यात उच्चांकी उचल दिल्याबद्दल शेतकरी संघटनांतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार. रेठरे बुद्रुक, ता. २६ : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला ३००० रूपये पहिली उचल जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यात उच्चांकी उचल दिल्याबद्दल बळीराजा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला.  शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने नेहमीच उच्चांकी दर देऊन, शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाही कृष्णा कारखाना किती रुपये दर जाहीर करणार याकडे शेतकरी वर्गाचे डोळे लागले असताना, कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ३००० रुपयांची पहिली उचल देण्याचा निर्णय जाहीर केला.  शेतकऱ्यांना सर्वाधिक उचल जाहीर केल्याबद्दल बळीराजा संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष पंजाबराव पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांच्या हस्ते चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पंजाबर...

नारी रत्न अवॉर्ड साठी नामांकने पाठवा; सांची फौंडेशनचे आवाहन.

Image
  नारी रत्न अवॉर्ड साठी नामांकने पाठवा; सांची फौंडेशनचे आवाहन. तळमावले/वार्ताहर विविध क्षेत्रात आदर्श असलेल्या आणि सामाजिक जडणघडणीसाठी उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला आणि संस्था यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील सांची फौंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरीय "सांची-नारी रत्न पुरस्कार" देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन सांची फौंडेशन चे संस्थापक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामान्यांमधील आदर्श महिलांना पुरस्काराने सन्मानित करुन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. डाॅ.संदीप डाकवे यांच्या मार्गदर्शनाखाली सांची फौंडेशन ने नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. पुरस्कारासाठी पात्र महिलांनी नामांकनासह आपल्या क्षेत्रातील केलेल्या कार्याचे फोटो, वृत्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे इ. साहित्य पाठवावे. आलेल्या नामांकनामधून निवड समितीने निवडलेल्या पुरस्कार्थींना एका भव्यदिव्य व शानदार कार्यक्रमात दिग्गज मान्य...

सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी होणार.

Image
  सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी होणार, कराड विमानतळ एमआयडीसी कडे हस्तांतरण करणार. _______मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. सातारा दि. 25 : महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री   स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे  हस्तांतर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील...

कृष्णा हॉस्पिटलला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट.

Image
    कृष्णा हॉस्पिटलला  मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट; डॉ. अतुल भोसले व विनायक भोसले यांनी केले स्वागत.    कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे केलं कौतुक. कराड - प्रतिनिधी. कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवेतील योगदान अभूतपूर्व आहे. कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलने दिलेली वैद्यकीय सेवा विशेष उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले. कराडच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन, कॅम्पसची पाहणी केली.           भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी विशेष उपस्थित असलेले पालकमंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख या मान्यवरांचेही स्वागत करण्या...

कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

Image
  कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. सातारा दि. २५ - कराड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.     या वेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माझी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार आदी उपस्थित होते.    या नवीन शासकीय विश्रामगृहासाठी २० कोटी २२ लाख ३४ हजार रुपये इतका निधी मंजूर आहे. त्यापैकी १५ कोटी ७५  लाख ५२ हजार रुपयांची कामे स्थापत्य स्वरूपाची असून उर्वरित कामे विद्युतीकरण v फर्निचरची आहेत. एकूण ४ मजल्यांच्या या इमारतीमध्ये ३  व्हीव्हीआयपी कक्ष, १ पी. ए. कक्ष व ४ अधिकारी कक्ष आहेत. प्रत्येक व्हीव्हीआयपी कक्षामध्ये वेटींग रुम, ...

कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण.

Image
  कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. सातारा दि. २५ - कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.   यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख  आदी उपस्थित होते.     कराड येथे ५ मजली भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात आलेली आहे.  १७ कोटी २ लाख ५० हजार रुपये असा या इमारतीचा बांधकाम खर्च आहे. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ७,५७३ चौ.मी. इतके आहे. भूमिगत मजल्यावर वाहनतळ असून प्रत्येक मजल्यावर स्वच्छता गृहाचीही सोय करण्यात आली आहे. तसेच या इमारतीमध्ये प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, कृषी, उपनिबंधक, नगरभूमापन, उपकोषागर, सेतू ही कार्यालये असणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन.

Image
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन. सातारा, दि.२५: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडमधील शंभुतीर्थ  येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, सचिव रणजित पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील  यांनी स्वागत केले. कराड नगर परिषद हद्दीत स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणी व अनुषंगिक कामाकरिता कराड नगर परिषदेला  ८ आठ कोटी रुपये  वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.  प्रकल्प खर्चाच्या ९० टक्के हिस्स...

चचेगाव वि.का.स.सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी श्री.सर्जेराव शिंदे व श्री.संपत शेलार यांची निवड.

Image
  चचेगाव वि.का.स.सेवा सोसायटीच्या  स्वीकृत संचालक पदी श्री.सर्जेराव शिंदे व श्री.संपत शेलार यांची निवड. मलकापूर - प्रतिनिधी. चचेगाव ता.कराड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी श्री.सर्जेराव शिंदे व श्री.संपत शेलार यांची निवड करण्यात आली, या निवडी वेळी सोसायटीचे  सचिव श्री.विलास शिंदे,चेअरमन श्री.लालसो पवार,व्हा.चेअरमन श्रीमती शांताबाई पवार,सोसायटीचे सर्व संचालक,तसेच रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.अर्जुन पवार, ग्रा.पं.सदस्य श्री.राहुल पवार,श्री.युवराज पाटील,श्री.कृष्णाजी बोडरे,श्री.अभिजित पाटील,श्री.सचिन उपस्थित होते.पवार,श्री.शंकर पवार, श्री.बबन बोडरे,श्री. आत्माराम काळोखे, श्री. निवास शेलार,श्री. अतुल बारटक्के श्री.विलास पवार,  तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित,होते.  या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार मा.श्री.पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री. अविनाश मोहिते तसेच रयत सहकारी  साखर कारखान्याचे चेअरमन श्री उदयसिंह दादा पाटील उंडाळकर,यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

17 वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

Image
  17 वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.              सातारा दि. 22 :  कराड येथे आयोजित 17 वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन तसेच जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर 2022  रोजी सकाळी 10.30 वाजता  होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट, बैल बाजार येथे दि. 24 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.             या कार्यक्रमास महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून जिल्ह्यातील सर्व  लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.     ...

कुसुर येथे 1983 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला संपन्न.

Image
  कुसुर येथे 1983 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला संपन्न. कराड - प्रतिनिधी. कुसूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील या शाळेच्या 1983 सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या 80 होते त्यातले आत्ता 50 विद्यार्थी या गेट-टु गेदर साठी जमले होते. तब्बल चाळीस वर्षानंतर हे सर्व लोक एकत्रित जमल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर कायम होता. यामध्ये अनेक विद्यार्थी शासकीय निमशासकीय खाजगी कंपनी अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पदावरती काम करीत आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये त्या सालच्या गुरुवर्य शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं ते किमान 80 ते 82 वयाच्या आहेत त्यांनीही आवर्जून या स्नेह मेळाव्यास उपस्थित लावली.       या स्नेह मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने सर्वजण आनंदी होते व त्यानिमित्ताने एकमेकांची सुख दुःखे यामध्ये भविष्यात सहभागी होता येईल असा मानस या छोट्या खाणी कार्यक्रमातून व्यक्त होत होता. या कार्यक्रमास उपस्थित कर्नल महादेव काटेकर, पोलीस इन्स्पेक्टर राजकुमार कारंडे, मुख्याध्यापक आनंदराव मोरे मॅ...

आनंददूत....

Image
                       आनंददूत.... मुलांच्या आनंदासाठी माझी चाललेली धडपड पाहून तिने मला केलेली मदत विचार करायला लावणारी होती. हल्ली प्रत्येक गोष्टीत 'व्यवहार' शोधणाऱ्या माणसांच्या गर्दीत त्या ताईचे वागणे मला खूप काही शिकवून गेले. तिच्या स्वभावातील सहजता मला स्वच्छ काचेच्या गोट्यासारखी भासली.        कंचे नाते...खरे !                                         अनुभव.                                     आपल्या आयुष्यात काही घटना अशा घडतात की, त्यातून आपल्याला जीवनमंत्र मिळतो. समाजातील अशिक्षित व साधी माणसं देखील आपल्या वागण्यातून सदाचाराची शिकवण देतात. असाच एक प्रसंग. एक इंग्रजी म्हण आहे, The best helping hand is at the end of your own arm. याचा अर्थ "तुमचा सर्वात चांगला मदतकर्ता हे तुम्ही स्वतःच आहात. तुमच्या हातांचा म्...

कोटेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोवे मध्ये मानक ब्युरो क्लबची स्थापना .

Image
  कोटेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोवे मध्ये मानक ब्युरो क्लबची स्थापना . कराड - प्रतिनिधी.(प्रविण पाटील.) BIS व सायन्स सेंटर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय शुक्ला संराच्या मार्गदर्शनाखाली तसेच मिना सोनावणे मॅडम यांच्या प्रेरणेने श्री कोटेश्वर विद्यालय व ज्यु कॉलेज गोवे ता. जि. सातारा येथे मानक ब्युरो क्लबची स्थापना करण्यात आली .  बाजारपेठेतून ग्राहक मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतात. परंतु कोणत्या वस्तूंना भारतीय मानक ब्युरोमार्फत मान्यता दिली आहे. याचे ज्ञान मात्र ग्राहकांना नसते. या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक उत्पादके निकृष्ट दर्जाच्या वस्तू ग्राहकांच्या माती मारतात. अशी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून व ग्राहकात जागृती निर्माण व्हावी. या उद्देशाने येथील श्री कोटेश्वर विद्यालय व ज्यु कॉलेज गोवे ता. जि. सातारा येते भारतीय मानक ब्युरोच्या  वतीने शाळा व कॉलेज स्तरावर या ब्युरोची स्थापना करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून प्रशिक्षण देण्यात आली. व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. यावेळी श्री लक्ष्मण उबाळे सर व श्री अजितकुमार टंकस...

दलित महासंघाचे दि.१८ रोजी कराड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन.

Image
  दलित महासंघाचे दि.१८ रोजी कराड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन. कराड - प्रतिनिधी. दलित, आदिवासी,भटके आणि भुमिहीन शेतमजूर यांची गायरान तसेच शासकीय जमिनीवरील निवासी कारणासाठीची अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत या मागणीसाठी शुक्रवार दि.१८/११/२०२२ रोजी कराड तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे कराड तालुका प्रभारी जयवंत सकटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सदरचे आंदोलन दलित महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असून या आंदोलनास जिल्ह्यातील मान्यवर भेटी देणार आहेत. धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष सुरज घोलप,युवा नेते राहुल वायदंडे,किशोर साठे यांचेसह अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

नांदगाव येथे धनगर समाजबांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न.

Image
  धनगर समाजाला न्याय दिल्याशिवाय  भाजपा स्वस्थ बसणार  नाही : आ. चंद्रशेखर बावनकुळे. नांदगाव येथे धनगर समाजबांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न. कराड, ता. १२ : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापर्यंत धनगर समाजाचा वापर फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी व मतांसाठी केला. पण धनगर समाजाच्या हिताचा विचार करणारा कोणता पक्ष असेल, तर तो फक्त भाजपा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून, तो सोडविण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न केले जातील. धनगर समाजाला न्याय दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपाच्यावतीने नांदगाव (ता. कराड) येथे आयोजित धनगर समाज बांधवांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.  भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गंत आ. बावनकुळे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सायंकाळी नांदगाव येथे त्यांचे ढोलांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच धनगर समाजाच्यावतीने पारंपरिक घोंगडे व काठी देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.   विचारमंचावर भ...

‘जयवंत शुगर्स’च्या १२ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ.

Image
   ‘जयवंत शुगर्स’च्या १२ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ. कराड, ता. ६ : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या १२ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.  याप्रसंगी श्री. विनायक भोसले, ‘जयवंत शुगर्स’चे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, जनरल मॅनेजर एन. एम. बंडगर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अपर्णा निकम यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वजनकाटा व गव्हाणपूजन करण्यात आले. यावेळी पैलवान आनंदराव मोहिते, एम. के. कापूरकर, ‘जयवंत शुगर्स’चे उपसरव्यवस्थापक (टेक्निकल) आर. आर. इजाते, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, केन मॅनेजर नाथाजी कदम, चिफ अकौटंट आर. के. चन्ने, पर्चेस मॅनेजर व्ही. व्ह...

भैरवनाथ सोसायटी सभासदांना 14 टक्के लाभांश व भेटवस्तूचे वाटप.

Image
  भैरवनाथ सोसायटी सभासदांना 14 टक्के लाभांश व भेटवस्तूचे वाटप. कराड - प्रतिनिधी. आटके ता. कराड येथील भैरवनाथ विकास सेवा सोसायटीने दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सभासदांना 14 टक्के लाभांश व भेटवस्तूचे वाटप कृष्णा कारखान्याचे संचालक श्री गुणवंतराव पाटील (भाऊ) यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.  यावेळी झालेल्या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन अरविंद गुणवंतराव पाटील, व्हाईस चेअरमन उत्तम आत्माराम जाधव, कृष्णा बँकेचे व्यवस्थापक समितीचे सदस्य प्रमोद पाटील, कृष्णा कृषी परिषद सदस्य गजेंद्र पाटील, राजेश भगवान जाधव, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर बी जे काळे सर, शेतीतज्ञ, उद्योगपती माणिकराव पाटील, माजी उपसरपंच बाळकृष्ण जाधव, सुभाष पाटील सर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, एम बी पाटील सर यांच्यासह सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृष्णा कारखान्याच्या 63 व्या गळीत हंगामाचा रविवारी शुभारंभ.

Image
कृष्णा कारखान्याच्या 63 व्या गळीत हंगामाचा रविवारी शुभारंभ. रेठरे बुद्रुक, ता. 5 : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा 63 वा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.उत्तरा भोसले यांच्या शुभहस्ते रविवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. अशी माहिती कार्यकारी संचालक श्री. सुर्यकांत दळवी यांनी दिली. कारखान्याच्या सन 2022-23 या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण करण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची पूर्वतयारी झालेली आहे. कारखान्याच्या मशिनरीची ओव्हर ऑइलींगची कामे, त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरुस्त्या इत्यादी कामेही पूर्ण झाली आहेत. प्रारंभी उपाध्यक्ष जगदीश जगताप व त्यांच्या पत्नी सौ. विद्या जगताप यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करण्यात येणार आहे. समारंभात कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती कार्यकारी संचालक श्री. सुर्यकांत दळवी यांनी दिली आहे. तसेच कार्यक्रमाला सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ...

कोडोलीत सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Image
  कोडोलीत  सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. कार्वे प्रतिनिधी :-                   कोडोली ता.कराड येथील श्री. सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्री. सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सिद्धनाथ मंदिर कोडोली येथे संपन्न होणार आहे. तसेच यात्रेनिमित्त शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर यांचे कीर्तन होणार आहे. तसेच  रविवारी सकाळी 6 वाजता श्री. सिद्धनाथ रथोत्सवास प्रारंभ होईल व सोमवार दिनांक 07 नोव्हेंबर रोजी रात्री  9 वाजता ह.भ.प.सुप्रियाताई खंडागळे यांचे कीर्तन होणार आहे. अशी माहिती कोडोलीतील श्री सिद्धनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष कृष्णा विष्णू जगताप यांनी दिली आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थितीत राहून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी केले आहे.