भारत विद्यामंदिर संभाजीनगर सातारा विद्यालयांमध्ये मानक ब्युरो क्लबची स्थापना.
भारत विद्यामंदिर संभाजीनगर सातारा विद्यालयांमध्ये मानक ब्युरो क्लबची स्थापना.
कराड प्रतिनिधी :- (प्रविण पाटील)
बीआयएस व सायन्स सेंटर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय शुक्ला सरांच्या मार्गदर्शनाखाली भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष मा. अँड.कु. सीमा दिवाकर भोरे मॅडम यांच्या प्रेरणेने व संस्थेच्या सचिव व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुपमा दिवाकर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत विद्यामंदिर संभाजीनगर सातारा या माध्यमिक विद्यालयांमध्ये भारतीय मानक ब्युरो क्लबची स्थापना करण्यात आली.
बाजारपेठेतून ग्राहक मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतात. परंतु कोणत्या वस्तूंना भारतीय मानक ब्युरोने मान्यता दिलेली आहे याचे ज्ञान मात्र ग्राहकांना फारसे नसते. या ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक उत्पादके निकृष्ठ दर्जाच्या वस्तू ग्राहकांच्या माथी मारतात. अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी व समाजात जनजागृती करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोच्यावतीने शाळास्तरावर या ब्युरोची स्थापना करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक द्वारे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना बीआयएस केअर ॲप डाऊनलोड करून वापर करण्याबाबत प्रशिक्षणासाठी इ.८वी ते इ.१० वी मधील 310 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते. या सर्वांना मेंटर श्री. प्रशांत भोसले यांनी प्रशिक्षण दिले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अँड.कु. सीमा भोरे, सचिव व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.अनुपमा भोरे मॅडम, माजी मुख्याध्यापक श्री. अतुल भोरे सर, संचालक मंडळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment