कृष्णा कारखान्याच्या 63 व्या गळीत हंगामाचा रविवारी शुभारंभ.
कृष्णा कारखान्याच्या 63 व्या गळीत हंगामाचा रविवारी शुभारंभ.
रेठरे बुद्रुक, ता. 5 : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा 63 वा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.उत्तरा भोसले यांच्या शुभहस्ते रविवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. अशी माहिती कार्यकारी संचालक श्री. सुर्यकांत दळवी यांनी दिली.
कारखान्याच्या सन 2022-23 या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण करण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची पूर्वतयारी झालेली आहे. कारखान्याच्या मशिनरीची ओव्हर ऑइलींगची कामे, त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरुस्त्या इत्यादी कामेही पूर्ण झाली आहेत.
प्रारंभी उपाध्यक्ष जगदीश जगताप व त्यांच्या पत्नी सौ. विद्या जगताप यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करण्यात येणार आहे. समारंभात कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती कार्यकारी संचालक श्री. सुर्यकांत दळवी यांनी दिली आहे. तसेच कार्यक्रमाला सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, व्यापारी व हितचिंतक या सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी केले.
.jpeg)
Comments
Post a Comment