कुसुर येथे 1983 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला संपन्न.

 कुसुर येथे 1983 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला संपन्न.

कराड - प्रतिनिधी.

कुसूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील या शाळेच्या 1983 सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या 80 होते त्यातले आत्ता 50 विद्यार्थी या गेट-टु गेदर साठी जमले होते. तब्बल चाळीस वर्षानंतर हे सर्व लोक एकत्रित जमल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर कायम होता. यामध्ये अनेक विद्यार्थी शासकीय निमशासकीय खाजगी कंपनी अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पदावरती काम करीत आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये त्या सालच्या गुरुवर्य शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं ते किमान 80 ते 82 वयाच्या आहेत त्यांनीही आवर्जून या स्नेह मेळाव्यास उपस्थित लावली.

      या स्नेह मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने सर्वजण आनंदी होते व त्यानिमित्ताने एकमेकांची सुख दुःखे यामध्ये भविष्यात सहभागी होता येईल असा मानस या छोट्या खाणी कार्यक्रमातून व्यक्त होत होता. या कार्यक्रमास उपस्थित कर्नल महादेव काटेकर, पोलीस इन्स्पेक्टर राजकुमार कारंडे, मुख्याध्यापक आनंदराव मोरे मॅनेजर महिंद्रा,मॅनेजर धनंजय कुलकर्णी,राज्य परिवहन कराड आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक रामवीर व सर्व 1982 सालचे विद्यार्थी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .