शिवतेज सामाजिक संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी.
शिवतेज सामाजिक संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी.
कराड - प्रतिनिधी.
शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवतेज सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली .येवती तालुका कराड येथील शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या वतीने विठोबाची वाडी तालुका कराड येथील झेडपी शाळेला रंग कामासाठी आर्थिक निधी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे .विठोबाची वाडी तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रताप भनगे यांच्या माध्यमातून रंग दे शाळा हा उपक्रम राबवला जात आहे. याच उपक्रमाला प्रतिसाद देत सोशल मीडिया मधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याच आव्हानाला स्वीकारत शिवतेज सामाजिक विकास संस्थेचे सचिव पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी संस्थेच्या माध्यमातून आपल्या परीने हा निधी उपलब्ध करून दिला ,रंग दे शाळेसाठी विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या शाळेला भेटी देऊन कौतुक केले. रंग दे शाळेसाठी ग्रामस्थासह, विविध सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांसाठी सहकार्य केले .

Comments
Post a Comment