‘जयवंत शुगर्स’च्या १२ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ.

 

 ‘जयवंत शुगर्स’च्या १२ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ.


कराड, ता. ६ : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या १२ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. 


याप्रसंगी श्री. विनायक भोसले, ‘जयवंत शुगर्स’चे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, जनरल मॅनेजर एन. एम. बंडगर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अपर्णा निकम यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वजनकाटा व गव्हाणपूजन करण्यात आले.


यावेळी पैलवान आनंदराव मोहिते, एम. के. कापूरकर, ‘जयवंत शुगर्स’चे उपसरव्यवस्थापक (टेक्निकल) आर. आर. इजाते, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, केन मॅनेजर नाथाजी कदम, चिफ अकौटंट आर. के. चन्ने, पर्चेस मॅनेजर व्ही. व्ही. थोरात, इरिगेशन इंजिनिअर आर. एस. नलवडे, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, मुख्य शेतकरी अधिकारी आर. जे पाटील, मनुष्यबळ विकास अधिकारी संजय भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, डिस्टीलरी विभागप्रमुख व्ही.  जी.  म्हसवडे, सुरक्षा अधिकारी विठ्ठल भोसले, केनयार्ड सुपरवायझर एस. एम. सोमदे, ए. एम. गोरे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

 


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .