दलित महासंघाचे दि.१८ रोजी कराड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन.

 दलित महासंघाचे दि.१८ रोजी कराड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन.


कराड - प्रतिनिधी.

दलित, आदिवासी,भटके आणि भुमिहीन शेतमजूर यांची गायरान तसेच शासकीय जमिनीवरील निवासी कारणासाठीची अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत या मागणीसाठी शुक्रवार दि.१८/११/२०२२ रोजी कराड तहसीलदार कार्यालयासमोर

एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे कराड तालुका प्रभारी जयवंत सकटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

सदरचे आंदोलन दलित महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असून या आंदोलनास जिल्ह्यातील मान्यवर भेटी देणार आहेत.

धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष सुरज घोलप,युवा नेते राहुल वायदंडे,किशोर साठे यांचेसह अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .