कोटेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोवे मध्ये मानक ब्युरो क्लबची स्थापना .
कोटेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोवे मध्ये मानक ब्युरो क्लबची स्थापना .
कराड - प्रतिनिधी.(प्रविण पाटील.)
BIS व सायन्स सेंटर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय शुक्ला संराच्या मार्गदर्शनाखाली तसेच मिना सोनावणे मॅडम यांच्या प्रेरणेने श्री कोटेश्वर विद्यालय व ज्यु कॉलेज गोवे ता. जि. सातारा येथे मानक ब्युरो क्लबची स्थापना करण्यात आली .
बाजारपेठेतून ग्राहक मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतात. परंतु कोणत्या वस्तूंना भारतीय मानक ब्युरोमार्फत मान्यता दिली आहे. याचे ज्ञान मात्र ग्राहकांना नसते. या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक उत्पादके निकृष्ट दर्जाच्या वस्तू ग्राहकांच्या माती मारतात. अशी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून व ग्राहकात जागृती निर्माण व्हावी. या उद्देशाने येथील श्री कोटेश्वर विद्यालय व ज्यु कॉलेज गोवे ता. जि. सातारा येते भारतीय मानक ब्युरोच्या वतीने शाळा व कॉलेज स्तरावर या ब्युरोची स्थापना करण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून प्रशिक्षण देण्यात आली. व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.
यावेळी श्री लक्ष्मण उबाळे सर व श्री अजितकुमार टंकसाळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
श्री कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव, सचिव तुकाराम आण्णा जाधव संस्थेचे संचालक भुजंगराव जाधव तसेच संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या श्रीमती विभा साबळे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment