कोडोलीत सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
कोडोलीत सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
कार्वे प्रतिनिधी :-
कोडोली ता.कराड येथील श्री. सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्री. सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सिद्धनाथ मंदिर कोडोली येथे संपन्न होणार आहे. तसेच यात्रेनिमित्त शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर यांचे कीर्तन होणार आहे. तसेच रविवारी सकाळी 6 वाजता श्री. सिद्धनाथ रथोत्सवास प्रारंभ होईल व सोमवार दिनांक 07 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता ह.भ.प.सुप्रियाताई खंडागळे यांचे कीर्तन होणार आहे. अशी माहिती कोडोलीतील श्री सिद्धनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष कृष्णा विष्णू जगताप यांनी दिली आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थितीत राहून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी केले आहे.

Comments
Post a Comment