कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात कौशल्य विकास शिबिर संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात कौशल्य विकास शिबिर संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कौशल्य विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी कौशल्य विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. महत्त्वपूर्ण कौशल्य जर आत्मसात केली तर एक यशस्वी करिअर घडविण्यात कोणतीच अडचण येणार नाही म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शिक्षकेतर कर्मचारी यांना संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज घोगावच्या अधिव्याख्याता सौ. शीतल मोहिते यांनी संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याविषयी मूलभूत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी केले.

Comments
Post a Comment