कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये नुकतीच पालक सभा उत्साहात संपन्न झाली.
महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व त्यातील विद्यार्थ्यांची प्रगती व अधोगती याविषयी पालकांना संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आपला पाल्य कशा प्रकारचे शिक्षण घेत आहे, त्याची प्रगती कशी आहे, पालकांच्या काही शंका आहेत का हे जाणून घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सतत पालक विद्यार्थी व शिक्षक सभा आयोजित केली जाते. त्याच अनुषंगाने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेवेळी विद्यार्थी व पालक यांना सर्व विषयांमध्ये मिळालेल्या गुणांविषयी माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांना सर्व परीक्षाविषयी माहिती दिली. तसेच पालकांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निरंसन करण्यात आले. यावेळी काही पालकांनी आपली मते व्यक्त केली. या सभेसाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. श्रद्धा वैद्य यांनी केले.

Comments
Post a Comment