वडगाव हवेलीच्या श्री सिद्धनाथाची बुधवारी रथयात्रा.
वडगाव हवेलीच्या श्री सिद्धनाथाची बुधवारी रथयात्रा.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाची जय्यत तयारी.
कार्वे - प्रतिनिधी.
वडगाव हवेली (ता. कराड) येथील कुलदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची रथयात्रा बुधवारी (दि. 13 ) रोजी होत आहे.
काळाच्या ओघात यात्रेचे स्वरूप बदलत असताना वडगांव हवेली गावच्या सिद्धनाथ रथ यात्रेला मात्र वेगळाच इतिहास आणि परंपरा आहे. या यात्रेचा संपूर्ण मान गावातील बारा बलुतेदार मंडळींना विभागून दिला आहे.
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही यात्रेसाठी मंदिराची रंगरंगोटी, सजावट केली आहे. पाझर तलावाच्या निसर्गरम्य परिसरात असलेले सिध्दनाथ मंदिर सर्वाचे आकर्षन ठरत आहे.
दोन दिवस चालणाऱ्या यात्रेची ओढ भाविकांना दिपवाळी पासूनच लागते. बलिप्रतिपदा, दिपवाळी पाडव्याला संपूर्ण गावासह श्री सिध्दनाथ मंदिरामध्ये परंपरेनुसार घट बसवले जातात. याच दिवशी सिध्दनाथ जोगेश्वरी नवरत्न (उपवास) प्रारंभ होतो. नवरात्र काळात मंदिरात दररोज सकाळी आरती, पुजा - अर्चा काकड आरती, मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरू असते. दरम्यान या काळात दररोज श्री सिध्दनाथाची विविध वेशातील पूजा बांधली जाते.
कार्तिक शुक्ल पक्ष १२ म्हणजे तुळशी विवाहादिवशी रात्री १२ वाजनेच्या सुमारास भाविकांच्या उपस्थित श्री सिध्दनाथ जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होतो.
यानंतर सुमारे १५ दिवसांनी म्हणजे मार्गशीर्ष कृ. पक्ष १म्हणजे देवदिपावली दिवशी देवाची लग्नाची वरात म्हणजे रथोत्सव साजरा केला जातो.
सालाबादप्रमाणे यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी मानकरी व पुजारी मंडळी देवाच्या मूर्ती सजवलेल्या रथामध्ये विराजमान करून पुजा आरती करून हा रथ भाविकांकडून गावातून डोंगराकडील श्रींच्या मंदिराकडे ओढत नेला जातो. मंदीराजवळ पोहचल्यानंतर रथावर गुलाल खोबर्याची उधळण होते. यावेळी गुलाल खोबर्यामध्ये नवसफेड करण्यासाठी गुलाल खोबर्याची तुला करण्याची पद्धत आहे. सायंकाळी याठिकाणी महाआरती झाल्यानंतर गुलाल-खोबऱयाच्या उधळणीत रथ गावाकडे परततो.
यावर्षी रविवारी ही यात्रा पार पडत आहे. या यात्रेचा सर्व गावातील बारा बलुतेदार यांचेकडे आहे. गावाच्या पूर्वेस चौरंगनाथ डोंगराच्या पायथ्याशी पाझर तलाव व निसर्गरम्य परिसरात श्री सिद्धनाथाचे मंदिर आहे. एका आख्यायिकेनुसार फार पूर्वी या ठिकाणचे भक्त म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी जात असत. एका भक्ताच्या विंनंतीवरून देवाने या ठिकाणी वास्तव्य करण्याचे वचन दिले. व त्या भक्तापाठोपाठ देव याठिकाणी आले. येथील भाविकांनी येथे दगडी मंदिर बांधले होते. सुमारे १९९० चे दरम्यान हया दगडी मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच २००७ मध्ये नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना केली.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर रथ व मंदिर सजविण्याची लगबग गावामध्ये गेली आठवडाभर सुरु होती. त्याचबरोबर सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने विशेष परिश्रम घेतले आहेत. तसेच यात्रेनिमित्त दोन मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत यात्रा शांततेत पार पाडण्याचे आहवान ग्रामपंचायती कडून करणेत आले आहे.

Comments
Post a Comment