श्री. कोटेश्वर विद्यालयाच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर(National level) निवड.
श्री. कोटेश्वर विद्यालयाच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर(National level) निवड.
कराड - प्रतिनिधी.
भारत सरकार च्या विज्ञान तंत्रज्ञान विभागा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2023 मध्ये विद्यालयाने सादर केलेले शेतीसाठी पाणी व्यवस्थापनात IOT (Internet of things) या तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पाची राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. इ .10 वी मधील चि.आदित्य उत्तम जाधव व चि.यश तुकाराम संकपाळ यांचे शेतीसाठी पाणी व्यवस्थापनात IOT (Internet of things) या तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.
तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक सौ.विभा साबळे मॅडम (मुख्याध्यापिका), श्री.लक्ष्मण उबाळे सर , संस्थेचे अध्यक्ष मा . नंदा भाऊ जाधव, सचिव मा.श्री तुकाराम जाधव, मा.श्री.भुजंगराव जाधव, तसेच सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक ,कर्मचारी ,पालक व सर्व ग्रामस्थांनी यांनी अभिनंदन केले.तसेच त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Comments
Post a Comment