कासेगावात "माझी वसुंधरा अभियान"अंतर्गत पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद .

 कासेगावात "माझी वसुंधरा अभियान"अंतर्गत  पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद . 

कासेगाव - प्रतिनिधी.

 कासेगाव ग्रामपंचायत कासेगाव ने मा. आ. श्री जयंत पाटील, कारखान्याचे अध्यक्ष मा श्री प्रतीक पाटील व माजी जि. प. अध्यक्ष मा श्री देवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "माझी वसुंधरा अभियान" यामध्ये सहभाग घेतला आहे व त्या अभियान अंतर्गत पर्यावरण जनजागृती करण्याकरिता आयोजित केलेल्या सायकली रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कासेगाव येथील 400 हून अधिक पर्यावरण प्रेमीनीं या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. सुरुवात लोकनेते राजारामबापू पाटील स्मारक पदयात्री येथून रॅलीला सुरवात करण्यात आली  पदयात्री -बाजारपेठ -राजारामबापू व्यायाम मंडळ- चावडी चौक - डॉ आंबेडकरनगर -जुना स्टॅन्ड -ग्रामसचिवालय येथे समारोप करण्यात आला. या वेळी बोलताना ग्रा. पं. सदस्य अतुल लाहिगडे म्हणाले कि,जमीन, हवा, पाणी, अग्नि आणि आकाश या निसर्गाचे पंचतत्व जतन करण्याच्या दिशेने आम्ही काम करीत आहोत व सर्व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने कासेगाव एक पर्यावरणपूरक गाव होईल. राज समन्व्यक श्री श्रीधर कुलकर्णी यांनी सुरु असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व लोकनियुक्त सरपंच सौ कल्पना गावडे यांनी देखील कासेगावच्या सर्व नागरिकांनी या अभियांनात उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन केले.. यावेळी .जि. प. माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच कल्पना गावडे उपसरपंच सुजित पाटील ग्रामपंचायत सदस्य अतुल लाहीगडे, सुरेश माने दादासो पाटील सचिन पाटील, ग्रामविकास अधिकारी राहुल सातपुते, माजी सरपंच किरण पाटील, सुरेश गावडे दाजी गावडे  डॉ विक्रम आडके बंडासो देशमुख फिरोज आत्तार मकरंद माने, विकास लाहीगडे अभिषेक दंडवते, सोमनाथ लाहिगडे सुरज देशमुख यासह ग्रामपंचायत  सदस्य,सदस्या  विध्यार्थी , युवक  ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते.                                                                


  

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .