स्वर्गीय जनार्दन पाटील (काका)यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सवलतीच्या दरात वस्तू वाटपास सुरुवात.

 

स्वर्गीय जनार्दन पाटील (काका)यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सवलतीच्या दरात वस्तू वाटपास सुरुवात.

कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.)

स्वर्गीय जनार्दन पाटील (काका)यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ व कै. शरद लाहीगडे (अण्णा) मित्र परिवार यांच्या विशेष प्रयत्नातून 50 % सवलतीच्या दरात आटा चक्की, सायकल, वॉटर पुरिफायर, एलईडी टीव्ही वाटप प्रारंभ मा. श्री.जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य. मा. श्री खंडेराव जाधव , मा.श्री.देवराज पाटील व मा.श्री.अतुल लाहीगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी स्वर्गीय जनार्दन पाटील काका यांच्यावरील जीवनपट " जनतेचा जननायक "याचे देखील प्रसारण  करणेत आले. मा.जयंत पाटील  यांनी जीवनपटाची मांडणी चांगल्या व योग्य पद्धतीने केली आहे, तसेच 50% सवलतीच्या दरात वस्तू वाटप चा लाभ सर्व स्तरातील लोकांना होईल असे गौरवोद्गार काढले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही नागरिकांना सायकल, आटा चक्की वाटप करणेत आले.यावेळी कासेगाव च्या लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पना गावडे, उपसरपंच सुजित पाटील, माजी सरपंच  किरण पाटील, आयुब हवालदार, शहाजी माळी, कृष्णा मंडले, बंडासो देशमुख, विकास लाहिगडे, डॉ. विक्रम आडके, मकरंद माने, सागर कांबळे, सुशांत माने, अभिषेक दंडवते, नियाज मुल्ला, विनोद लाहिगडे, सुरज देशमुख, अक्षय लाहिगडे, नितीन देशमुख, गणराज देशमुख, पवन कांबळे, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य,सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .