सहकारमहर्षी किताबाची मानकरी सुपनेची बैलगाडी.

 सहकारमहर्षी किताबाची मानकरी सुपनेची बैलगाडी.

'साळशिरंबेत बैलगाडी शर्यतीचा थरार १८० गाड्यांचा सहभाग हजारो शौकिनांची उपस्थिती.'


साळशिरंबे :- बक्षिस वितरण प्रसंगी युवा नेते पंकज पाटील व इतर मांन्यवर.

उंडाळे- प्रतिनिधी.

सहकारमहर्षी जयवंतरावजी भोसले (आप्पा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कराड तालुक्यातील साळशिरंबे येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

सुपने येथील साईराज पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे एकतीस हजार रुपये बक्षिस पटकावून सहकारमहर्षी किताबाचा मान व शिल्ड मिळवले 

कराड तालुक्यातील साळशिरंबे येथे सहकारमहर्षी जयवंतरावजी भोसले (आप्पा) यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त युवा नेते पंकज पाटील मिञ परिवाराच्या वतीने भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेमध्ये साईराज पाटील सुपने यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पाचुंब्री वाटेगाव दुसरा पैलवान ग्रुप काले तिसरा जोतिर्लिंग प्रसन्न कालवडे शिंदेवाडी चौथा, अजयशेठ शिराळा पाचवा,बिरोबा प्रसन्न कुसुर सहावा, तानाजी देशमुख शास्ञीनगर मलकापूर या गाडीने सातवा क्रमांक पटकावला एकुन ३३ गटांतील स्पर्धेसाठी १८० गाड्या सहभागी झाल्या होत्या. 

यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, संजय शेवाळे मा सरपंच सवादे ,काकासो धर्मे, मलकापूरचे माजी विरोधीपक्षनेते हणमंतराव जाधव, विवेक पाटील, तानाजी देशमुख उपाध्यक्ष भाजपा कराड दक्षिण, डाॅ.सुरेश पाटील,रामभाऊ सातपुते, चंद्रकांत पाटील,मानसिंग कदम, मोटेसो, प्रविन थोरात, दिलीप पाटील, अभिजित कोठावळे, शरद पाटील,यांच्यासह विविध मांन्यवर उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांचे

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.सुरेशबाबा भोसले,  भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवा नेते डाॅ.अतुलबाबा भोसले, विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले, या स्पर्धेमध्ये समालोचन बबलु देसाई , पोपट देसाई यांनी केले उपस्थित सर्वांचे आभार पंकज पाटील यांनी मानले.  


                                
                                        *******


युवा नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वतीने आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे शेवाळेवाडी (उंडाळे) येथे वाटप.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .