कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्हिडिओ मेकिंग व इ पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्हिडिओ मेकिंग व इ पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव या महाविद्यालयामध्ये नुकतीच राज्यस्तरीय व्हिडिओ मेकिंग व इ पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा उत्साहात पार पडली.
महाविद्यालयातील विद्यार्थी हे शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या पारंगत असावेत याकरता राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यभरातील जवळपास सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी स्पर्धेच्या संयोजक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, मुख्य समन्वयक प्रा. सोनल सातपुते व समन्वयक प्रा. दीप्ती पाटील ह्या होत्या. इ पोस्टर प्रेझेंटेशनसाठी 70 महाविद्यालयानी व व्हिडिओ मेकिंग स्पर्धेसाठी 40 महाविद्यालयानी सहभाग घेतला होता. त्यामधे इ पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक सेजल पाटील (भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नवी मुंबई), द्वितीय क्रमांक निकिता लांबोरे (न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर) तर तृतीय क्रमांक मधुरा फंडे (जनेबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ फार्मसी वाघोली, पुणे) हिला मिळाला तसेच व्हिडिओ मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सिद्धी ढेभ (केसिटी कॉलेज ऑफ फार्मसी, कराड) द्वितीय क्रमांक ऋतुजा इंगळे (एम बी पी एस कॉलेज ऑफ फार्मसी, मायनी) तर तृतीय क्रमांक सानिया चंद्रगडी (श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म घोगावं) व सायली जाधव (एच एस बी व्ही टी एस परिक्रमा डिप्लोमा इन फार्मास्युटिकल सायन्स, काष्टी) या दोघींना विभागून देण्यात आले.
सर्व विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
*******
डॉ. अतुल भोसले (बाबा) यांच्या वतीने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न.
Comments
Post a Comment