"भाजपा सरकारांनी मागासवर्गांवर अन्याय करू नये"
"भाजपा सरकारांनी मागासवर्गांवर अन्याय करू नये" गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- देशात केंद्र सरकारसह विविध राज्यातील भाजप सरकारांद्वारे देशातील दलित-आदिवासी व इतर मागासवर्गीय समाजावर त्यांच्या विकासासाठी निधीचा गैरवापर करून व विकास योजनांना प्राधान्य न देऊन त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. विकास प्रक्रियेचे सामान्यीकरण केले जात नाही ही खेदाची बाब असून महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे सरकार हे फक्त दादा-भाऊ-नाना, काकांच्या राजकारणात गुंतलेले असून गोरगरिबांच्या कल्याणकारी योजनांपासून हटवले जात आहे. याला अनुसरून रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जाहिर निषेध करते व सरकारी यंत्रणेला लक्ष देण्याचे आवाहन करते. देशभरात भाजप सरकारची याबाबतची अनेक प्रकारे अपयश असून गेल्या १०–१२ वर्षात केंद्र व राज्य सरकारांनी अनुसूचित जाती-जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट निधी दिलेला नाही, म्हणजेच निधीचा सदुपयोग केलेला नाही तर महाराष्ट्रात अनु. जाती-जमातींना मंजूर निधी हा लाईनमध्ये बहिण योजना नेत्यांच्या वापरात राज्य सरकार दलित-आदिवासी विकासाबाबत गंभीर संदर्भातच चुकले आहे. प्राथमिकतः महाराष्ट्र ...