इंगरुळ ग्रामस्थांच्या वतीने बुद्ध जयंती निमित्ताने सांगली शिराळा तालुक्यात घर घर संविधान वाटप अभियान.
इंगरुळ ग्रामस्थांच्या वतीने बुद्ध जयंती निमित्ताने सांगली शिराळा तालुक्यात घर घर संविधान वाटप अभियान.
शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे)
इंगरुळ ग्रामस्थांच्या वतीने बुद्ध जयंती निमित्ताने सांगली शिराळा तालुक्यात घर घर संविधान वाटप अभियान.सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील इंगरुळ येथील ग्रामस्थांनी यावर्षी बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने अभियान राबविले आहे, या निमित्ताने ग्रामस्थांनी प्रथमच बुद्ध जयंती निमित्ताने घर घर सविधान अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. प्रत्येक घरात संविधान वाटप केले जाणार आहे, अशी माहिती ग्रामस्थ भीमसैनिक बाबासाहेब कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला नागपूर मध्ये ऐतिहासिक धम्मदीक्षा घेऊन एक मानवतेचा संदेश दिला आहे. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक क्षणाची आठवण आणि आम्ही या देशाचे नागरिक आहोत याची जाणीव करून देण्यासाठी हा शिराळा तालुक्यातील ग्रामस्थांना संविधान वाटप करून सर्व धर्म समभाव ही भावना जनमानसामध्ये पोचविण्यासाठी संविधानाचे घरोघरी वाटप करून समाजात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती बाबासाहेब कांबळे यांनी दिले आहे. समता सैनिक दलाचे सैनिक घरोघरी जाऊन संविधानाचे वाटप करणार आहेत.या अभिनव उपक्रमाचे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये स्वागत केले जात आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment