भाजपा सातारा जिल्हाध्यक्षपदी डॉ. अतुलबाबा भोसले यांची निवड.
भाजपा सातारा जिल्हाध्यक्षपदी डॉ. अतुलबाबा भोसले यांची निवड.
कराड - प्रतिनिधी.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा आज पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी केल्या. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत महत्वपूर्ण व प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या सातारा जिल्हाध्यक्षपदी डॉ. अतुलबाबा भोसले यांची निवड करण्यात आली. आहे. डॉ. भोसले यांनी सातारा लोकसभा प्रभारीपदाची सक्षमपणे निभावलेली जबाबदारी, तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात मिळवलेल्या मोठ्या विजयाची दाखल घेत त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्याचे बोलले जात आहे.

Comments
Post a Comment