शासकीय निवासी शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी विद्यार्थ्यांकरीता मोफत प्रवेश सुरु.
शासकीय निवासी शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी विद्यार्थ्यांकरीता मोफत प्रवेश सुरु.
कोल्हापूर, दि. ५ मे (जिमाका): सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर या कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, राधानगरी, गगनबावडा, शिरोळ व मसुदमाले ता. पन्हाळा अशा एकूण ४ शासकीय निवासी शाळांसाठी इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वी मधील विद्यार्थ्यांकरीता मोफत सुरु आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा निवासी शाळेत रिक्त जागेनुसार आरक्षण, गुणवत्ता व आर्थिक निकषाच्या अधिन राहून प्रवेश देण्यात येतो. यामध्ये अनुसूचित जाती ८० टक्के अनुसूचित जमाती १० टक्के विमुक्त जाती भटक्या जाती ५ टक्के दिव्यांग ३ टक्के विशेष मागास प्रवर्ग २ टक्के अशी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी अधिक माहितीसाठी संबंधित निवासी शाळेचे मुख्याध्यापक, गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६५१३१८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण सचिन साळे यांनी केले आहे.
सन २०२५-२६ या वर्षाकरीता इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वी करीता प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली) असून गरजू विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला स्वतःचा नसल्यास वडील, भाऊ किंवा बहीण, रहीवासी दाखला, पूर्वीच्या शाळेतील संचयी नोंद पत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, इत्यादी कागदपत्रांसह संबंधित निवासी शाळेचे मुख्याध्यापक, गृहपाल यांच्याकडे अर्ज भरुन सादर करावेत. निवासी शाळेमधील प्रवेशित विद्यार्थ्यांकरीता सकाळचा नाष्टा त्यासोबत दुध, उकडलेले अंडे, सफरचंद व सिझनेबल फळ, दोन्ही वेळेचे जेवण, निवासाची उत्तम सोय, गणवेश, अध्यायन व अध्यापन शैक्षणिक साहित्य सुविधा, गरम पाण्याची सोय, वाय-फाय सुविधा, स्वतंत्र प्रयोग शाळा, पिण्यासाठी शुध्द पाणी, ग्रंथालय व ई लायब्ररी सुविधा, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मिशिन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्य सर्व डिजीटल क्लासरुम, इयत्ता १० वी च्या विदयार्थ्यांकरीता स्वतंत्र अॅकॉस्टीक क्लासरुम, स्वतंत्र अभ्यासिका, मनोरंजन कक्ष, क्रीडा साहित्य व अत्याधुनिक जीम, सीसीटीव्ही निगराणीत सुरक्षित वातावरण, इत्यादी प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात असून अध्यापनाकरीता अर्हताधारक व अनुभवी शिक्षकवृंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment