बहुजनांच युवा नेतृत्व मा.अनिकेतभाऊ साळूंखे.
बहुजनांच युवा नेतृत्व मा.अनिकेतभाऊ साळूंखे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य,बंधुता या तत्त्वांचा प्रसार प्रचार करण्यासाठी आजच्या धकाधकीच्या जीवनात सामान्य जनतेच्या व्यथा मांडून त्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणारे मा.अनिकेतभाऊ साळुंखे, प्रदेशाध्यक्ष फकीरा पॅंथर सेना.
सर्वसामान्य कुटुंबातील संघर्षातून उभे राहिलेले एक कणखर युवा नेतृत्व मा. अनिकेतभाऊ साळुंखे. कराड तालुक्यातील सदाशिवगडच्या पायथ्यालगत एका सामान्य कुटुंबात जन्म झाला, घरची परिस्थिती बेताचीच होती. प्राथमिक शिक्षण सदाशिवगड येथील जि.प. शाळेत पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण हजारमाची येथे पूर्ण केले. त्यानंतर आय.टी.आय व बारावी सायन्स पर्यंत शिक्षण पूर्ण केले शिक्षण घेतच स्वतःच्या केटरिंगचा व्यवसाय सुरू केला व आज तो व्यवसाय लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे.
समाजसेवेची जाण असणारे अनिकेत भाऊ यांनी कोरोना काळात सक्रिय सामाजिक योगदान दिले. घरोघरी सॅनिटायझर वाटप करणे, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर येणाऱ्या कोणत्याही समस्येला ते सामोरे जात होते.
बहुजन समाजावर अन्याय अत्याचार झाल्यावर मा. अनिकेतभाऊ अग्रभागी असतात, त्याचबरोबर न्यायिक आंदोलने, मोर्चे, उपोषणे यात सक्रिय सहभागी असतात. यापुढेही बहुजनांच्या न्यायिक हक्कासाठी सदैव प्रयत्नशील असण्याचा मानस अनिकेतभाऊ यांनी व्यक्त केला.अश्या या बहुजन युवा नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व भावी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
__मा.जितेंद्र मच्छिंद्र सूर्यवंशी.


Comments
Post a Comment