बुद्ध जयंती निमित्त इंगरुळ येथे संविधान वाटप.
बुद्ध जयंती निमित्त इंगरुळ येथे संविधान वाटप.
इंगरुळ ग्रामविकास मंडळ मुंबई व इंगरुळ सिद्धार्थ नगर यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त घर घर संविधान वाटप अभियान राबवण्यात आले तसेच शाळा आणि वाचनालयामध्ये सुद्धा संविधान वाटप केले जाईल अशी माहिती भीमसैनिक बाबासाहेब कांबळे व आयु. जगन्नाथ कांबळे यांनी दिली
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती समता सैनिक दल होते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण विभागाचे जिल्हा (पश्चिम) सचिव व समता सैनिक बौद्धाचार्य आयुष्यमान शशिकांत कांबळे तसेच सैनिक आयु लहुजी वाघमारे सैनिक आयु रवींद्र शिवजातक हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते . ग्रमपंचायत सदस्य शिवाजी कांबळे.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. दिपक काबळे यांनी केले आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार प्रत्येक घरात समता सैनिक दलाचा जवान तयार करण्याचे संकल्प केला आहे. भीमसैनिक सुधीर कांबळे, अमोल मधुकर कांबळे, संजय कांबळे, कांबळे.आमदार कांबळे, राज कांबळे . उपासिका पुनम कांबळे, अर्चना कांबळे, सविता कांबळे तसेच उपासक आणि उपासिका मोठ्या प्रमाणात हजर होते बुद्ध जयंती निमित्त गुगवाड बुद्ध विहार या ठिकाणी धम्म सहल आयोजित करण्यात आली तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन.सुधीर कांबळे यांनी केले.


Comments
Post a Comment