बाबाजी पाटील पतसंस्थेच्या चेअरमन पदी आप्पासाहेब पाटील व्हाईस चेअरमनपदी अवधुत पाटील.

 बाबाजी पाटील पतसंस्थेच्या चेअरमन पदी आप्पासाहेब पाटील व्हाईस चेअरमनपदी अवधुत पाटील.

कराड - प्रतिनिधी.

        मलकापूर येथील  बाबाजी पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी आप्पासाहेब पाटील व व्हाईस चेअरमनपदी अवधुत पाटील यांची निवड सौ.एस पी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध झाली यावेळी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार सौ एस पी भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. 

      चेअरमन आप्पासाहेब पाटील म्हणाले कै. अंकुशराव पाटील यांचे निधन चार महिन्यापूर्वी झाली त्यांनी गेली तेहवीस वर्ष संस्थेसाठी वेळ देऊन संस्थेची प्रगती सर्वांना बरोबर घेवून  राजकारणविरहित अशी केली संस्थेसाठी त्यांचे खूप योगदान आहे त्यांच्या जाण्याने संस्थेत जी पोकळी निर्माण झाली ती न भरून येणारी अशी आहे त्यांनी ज्या पद्धतीने संस्थेचे कामकाज पारदर्शक केला आणि सभासदांचा विश्वास संपादन केला त्याच मार्गाने सर्वांना बरोबर घेऊन चेअरमन म्हणून अधिक जोमाने कामकाज करून संचालक मंडळाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगितले तसेच संस्थेचे  कर्जवाटप अधिक काळजीपूर्वक व योग्य पद्धतीने करून वसुलीसाठी अधिक प्रयत्न करून एनपीए शून्य टक्के राहील याची दक्षता घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे नवीन मलकापूर शाखेत सर्व ठेव योजनांचा लाभ ग्राहकांनी घेण्याच्या आव्हान यावेळी पाटील यांनी केले 

      बाबाजी पाटील पतसंस्था नेहमी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अशा लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज देता यावे अशा उद्देशाने कामकाज करत आहे आज सहकारी संस्थासमोर कित्येक प्रश्न आहेत तरीसुद्धा आपली संस्था प्रगतीचे नवनवीन टप्पे पूर्ण करत आहे तसेच संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीवरती भर देत कामकाज करत आहे तसेच संस्था सभासदांना सतत लाभांश देत दरवर्षी संस्था सभासदांना दिनदर्शिका वाटप करत आहे तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार व सेवानिवृत्त हितचिंतकांचा सत्कार करत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करत आहे संस्थेने मागील आर्थिक वर्षात नऊ कोटीचा व्यवसाय केला आहे संस्थेकडे आज रोजी पाच कोटी अठरा लाख रुपये च्या ठेवी असून तीन कोटी साठ लाख रुपये चे कर्ज वाटप केले आहे तसेच दोन कोटी छत्तीस लाख रुपयांची गुंतवणूक आहे संस्थेस स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ आहे अशी माहिती संस्थेचे सचिव अस्लम मुल्ला  यांनी दिली. 

       यावेळी संचालक विजय देशमुख महेश बोरगावकर अंकुश पवार बापूराव नलवडे निलेश साळुंखे दीपक लावंड सौ मीनाक्षी कचरे सौ सुवर्णा शेवाळे यांची उपस्थिती होती  व्हाईस चेअरमन अवधूत पाटील यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .