आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांची तासवडे एमआयडीसीतील कंपनीस सदिच्छा भेट.
आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांची तासवडे एमआयडीसीतील कंपनीस सदिच्छा भेट.
कराड -प्रतिनिधी.
कराड दक्षिणचे आश्वासक विद्यमान आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांनी तासवडे ता.कराड एमआयडीसी परिसरातील श्री. नितीन पाटणकर यांच्या कंपनीस सदिच्छा भेट दिली. उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी निर्माण केलेल्या संधींमुळे अनेक स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे, हे निश्चितच प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर आज विविध उद्योजकांशी चर्चा केली. त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणींसंदर्भात चर्चा केली. येणाऱ्या आठवड्यात विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊन हे प्रश्न तातडीने सोडविले जातील.
या भेटीदरम्यान त्यांच्या उद्योगातील कार्यपद्धती, कामगार व्यवस्थापन आणि भविष्यातील विस्तार योजना याबाबत सविस्तर चर्चा झाली. स्थानिक तरुणांसाठी निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबत त्यांनी दाखवलेली सकारात्मक दृष्टी महत्त्वाची आहे. इतर उद्योजकांनी देखील याच पद्धतीने स्थानिक युवकांना नोकरीसाठी प्राधान्य दिले पाहिजे.
तसेच, तासवडे एमआयडीसी परिसरातील सर्वसाधारण घडामोडी, विकासाच्या संधी आणि भविष्यातील योजना यावरही चर्चा झाली. उद्योग क्षेत्राला चालना मिळावी, आणि परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिक उद्योगांचे बळकटीकरण आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मिती यासाठी कटिबद्ध आहे, अशा सकारात्मक भेटींमधून नवीन दिशा मिळत आहे.


Comments
Post a Comment