वारणा विद्यालय व ज्युनि. कॉलेज सागांव मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनि. कॉलेज सागांव मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.
2000 - 2001 मधील इ. १० वी विद्यार्थ्यांनींचा स्नेह मेळावा.
शिराळा - प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनि. कॉलेज सागांव मध्ये सन 2000 - 2001 मधील इयत्ता १० वी विद्यार्थ्यांनींचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्था संचालक मा. श्री. बाळासाहेब शेटे ,माजी मुख्याध्यापक आर. एस. माने सर, माजी मुख्याध्यापिका सौ.एस .बी .शेटे मॅडम व मुख्याध्यापक मा.अरविंद सदावर्ते सर, सर्व शिक्षक शिक्षिका , शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
याप्रसंगी माजी विद्यार्थिनी प्राजक्ता शेटे ,गितल फातले,राजश्री पाटील, सुषमा वाघ, शुभांगी टिपुगडे,संगीता शिंदे, रेखा शिंदे, सारिका दाभोळकर ,सविता सुतार, अलका कुंभार,दिपाली पाटील, दिपाली पवार ,वैशाली पवार ,कविता पाटील, आशा चौगुले, उमा मोहिते ,आदि विद्यार्थिनी दिल्ली पासून सागांव पर्यंतच्या विद्यार्थिनी एकत्र येऊन विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक यांच्या समवेत विद्यालयातील स्मृतींना उजाळा दिला.सर्वांनी आपल्या विद्यालयातील स्मृतींचे स्मरण करत आपल्या जीवनातील सर्वांगीण यशाचे श्रेय विद्यालय व सर्व शिक्षकांना दिले. आपल्याला मिळालेली संस्कार जीवन यशाचे श्रेय आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.तसेच विद्यालयास ज्ञानज्योती सप्रेम भेट दिली.याप्रसंगी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर सेवक यांनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्ही. डी. पाटील सरांनी केले.

Comments
Post a Comment