भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार.
भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार. शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे. भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने माजी सैनिकांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला.महामानवाच्या मुर्तींचे पुजन बाळू घोलप यशवंत घोलप यांनी केले.माजी सैनिक पांडुरंग घोलप दाजी शंकर घोलप भाऊ यांचा सत्कार उप सरपंच सुरेश जाधव नाना यांच्या हस्ते करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक सुनिल घोलप यांनी केले.पायल सिध्दार्थ यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन राजेश मिसाळ यांनी केले, तर आभार संदिप घोलप यांनी मानले. नियोजन गणेश ,शुभम,आयुष घोलप यांनी केले.