GONDWANA NEWS BREAKING .
ब्यूरो रीपोर्ट - शकूर मुल्ला.
दिनांक ०३ जानेवारी, २०२२, सोमवार.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती.
● मुंबईत बळजबरी घर बळकावण्याचा घाट, एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल
● वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन ॲपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
● कुपवाड शहरातील कुपवाड-बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या नांद्रेकर यांच्या मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये एका प्रेमी युगुलांनी विष प्राशन व गळफास घेऊन आत्महत्या केली
● आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; आत्तापर्यंत ८ लाखांहून अधिक नोंदणी
● साखर अनुदान प्रकरण : ‘जागतिक व्यापार संघटनेच्या निर्णयास भारताचे आव्हान; ‘डब्ल्यूटीओ’च्या तंटा निवारण समितीचे निष्कर्ष अवास्तव आणि अतार्किक
● पुणे : कमी वेळेत पिकणाऱ्या बासमती (११२१) लागवडीकडे वाढता कल; दरामध्येही क्विंटलमागे एक हजार रुपयांनी वाढ
● महिलांचे विवाहासाठीचे कायदेशीवर वय हे १८ वरून २१ वर्षे करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाची चिकित्सा केल्या जाणाऱ्या संसदीय समितीच्या ३१ सदस्यांत केवळ एकच महिला
● गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता संपवून टाकण्याची धमकी देतो; शिवसेना नेते व माजी खासदार शिवाजी आढळरावांचा गंभीर आरोप
● मुंबई : राणीबागेतील प्राण्यांचे पिंजरे तयार करण्याच्या निविदेत घोळ; काँग्रेस पाठोपाठ भाजपचाही आरोप; आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार
● ग्रामपंचायतींचे विकास नियोजन कागदावरच; राज्यात प्रास्ताविक कामे ४.९२ लाख; त्यात पूर्ण झालेली फक्त ९
● राज्यात दहा दिवसांत रुग्णसंख्या चारपटींहून अधिक वाढली; तूर्तास नवीन रुग्णांच्या तुलनेत मृत्यू कमी (०.४४ टक्के) असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालात दिसत आहे
● मुंबईत सद्यस्थितीत दहा कंटेनमेंट झोन असून १५७ इमारती कोरोना रुग्ण वाढीमुळे सील करण्यात आल्या आहेत
● भारत-आफ्रिका कसोटी मालिका : ऐतिहासिक मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य; दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून; कोहलीला वैयक्तिक विक्रमांची संधी
● राज्यात कोरोना रुग्णांची वाढ; रविवारी ११ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद; २ हजार ६९ रुग्णांची कोरोनावर मात; ५० जणांना ओमायक्रॉन संसर्ग
● ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपयेच राहणार; केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
● राज्यातील सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक, पर्यावरण प्रदुषण विरहीत करण्यासाठी निर्णय घेतल्याची माहिती
● पुण्यात खळबळजनक घटना : कर्जबारीपणास कंटाळून अगोदर आईची हत्या करून इंजिनअर मुलाने केली आत्महत्या
● उल्हासनगरात पोलिसांकडून अरेरावी, अंगावर घातली बुलेट; दिसेल त्याला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
● इचलकरंजी येथील भूमाफिया, गुंड संजय तेलनाडेला पोलीस कोठडी; शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिसांनी चालवत नेले
● लखीमपूर खेरीत भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी २ शेतकऱ्यांना अटक; आत्तापर्यंत ६ जणांवर पोलीस कारवाई
● मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात नदीत बस पडल्याने एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू; २८ जण जखमी
Comments
Post a Comment