कोडोलीत 61 विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाची लस.
कोडोलीत 61 विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाची लस.
कार्वे प्रतिनिधी :-
सातारा जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना कोव्हाक्सिंनचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवून 3 जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
कोडोली ता. कराड येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली हायस्कूलमधील इयत्ता 9 ते 10 वीमध्ये शिक्षण घेणार्या 61 विद्यार्थ्यांनी गुरुवारी कोरोनाची लस घेतली. तत्पूर्वी कोरोना लसीबद्दल जनमानसात पसरलेल्या अफवांबाबत शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोना लस पुर्णतः सुरक्षित असून त्याचे कोणत्याही प्रकारचे विपरीत परिणाम होत नाही. यापूर्वी ते स्वतः कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतल्याचे सांगून महामारीच्या वेळी लस एक उपाय आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार 15 ते 18 वयाच्या विद्यार्थ्यांनी लस घ्यावे, असे आवाहन केले होते. पालकांना सुद्धा याची जाणीव करून दिली होती.
पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लस घेतली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका वाय. बी.गिरी मॅडम, आरोग्य सेवक एस. सी. पवार , आशा सेविका तसेच शाळेचे मुख्याध्यापक सी. एस. माने, सर्व शिक्षक वृंद, यासह शाळेतील कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,पालक ग्रामपंचायत सदस्य संदीप होनकळसे, विक्रम थोरात उपस्थित होते.
Comments
Post a Comment