कविता शिंगाडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड.
कविता शिंगाडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड.
कार्वे प्रतिनिधी :-
संजयनगर (शेरे) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता शिंगाडे यांची बिनविरोध निवड झाली.ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी सरपंच शोभाताई मस्के यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सर्जेराव मदने यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी हि निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी कविता शिंगाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
यावेळी माजी उपसरपंच सर्जेराव मदने ग्रामपंचायत सदस्य पोपट मदने, अशोक आडके, मनिषा सातपुते, कमल पवार, सतिश चव्हाण, अंजली जाधव उपस्थित होते.तसेच मा. सरपंच राहुल निकम, मा. सरपंच नारायण शिंगाडे, मोहनराव साळुंखे, संपतराव निकम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन पवार, पोलिस पाटील सचिन साळुंखे, सुनिल शिंगाडे, नाना जाधव, राहुल पवार, विनोद बोडरे, अनिल डोंगरे , रमेश मस्के, दादासो शिरतोडे, राजु गुंजाळ, अमित शिंगाडे,अतिश शिंगाडे, निर्मला मदने, सावित्री माळी, शशिकांत जाधव, धिरज सुर्वे आदि उपस्थित होते.मा. सरपंच मोहनराव निकम व उद्योगपती डि.आर. चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. ग्रामविकास अधिकारी आर. एन. कोळी यांनी निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण केली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला सुत्रसंचलन संतोष सातपुते यांनी केले आभार अशोक मस्के यांनी मानले.
Comments
Post a Comment