वडगाव हवेली येथील श्री.खंडोबा देवाची यात्रा रद्द.

 वडगाव हवेली येथील श्री.खंडोबा देवाची यात्रा रद्द.



कार्वे प्रतिनिधी :-

  वडगाव हवेली ता.कराड येथील परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या    ग्रामदैवत श्री.खंडोबा देवाची यात्रा  दि.15 रोजी होणार होती परंतु कोरोनाच्या पाश्वभूमीवर  शासनाच्या नवीन अधिसूनेनुसार रद्द करण्यातआलीआहे. यात्राकालावधीत नियमानुसार धार्मिकपुजा कार्यक्रम होणार असून या शिवाय इतर सर्व कार्यक्रमहोणार नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर केलेआहे.


       कोरोनाच्या पाश्वभुमीवर यात्रेनिमित्त पालखी सहभागी होणारे देवाचे बैलगाडे,रथ,सासनकाठ्या दिवट्या यासह भाविकांना यात्रेमद्ये गर्दी करण्यास मनाई केली आहे.


    प्रतिवर्षी परिसरातील हजारो भाविक या यात्रेसाठी येत असतात. गटवर्षी पासून मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गतवर्षी पासुन सर्व ठिकाणच्या यात्रा उत्सव प्रशासनाने रद्द केले आहेत. याच पद्धतीने दि.15 रोजी होणारी येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रेबाबत येथील ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये आवश्यक धार्मिक कार्यक्रम वगळता यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन यात्रेच्या मानकऱ्यांना करणेत आले आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .