राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संस्कारांचा व विचारांचा वारसा आजच्या समाजातील प्रत्येक घटकाने जोपासावा. मुख्याध्यापक संजय यादव .
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संस्कारांचा व विचारांचा वारसा आजच्या समाजातील प्रत्येक घटकाने जोपासावा.
मुख्याध्यापक संजय यादव .
कोळे - प्रतिनिधी.
कोळे( ता. कराड )येथील संत घाडगेनाथ हायस्कूल मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
श्री.यादव पुढे म्हणाले महान व्यक्तींचा आदर्श समाजाच्या हितासाठी ,संस्कृती साठी गरजेचे असून अशी नररत्ने पुन्हा जन्माला येत नाहीत ही महान माणसे शरीराने आपल्यात नसली तरी त्यांचे विचार आपल्या मध्ये आहेत. जिजाऊ सारखी महान माता असल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि स्वामी विवेकानंदानी आपल्या देशाचे व संस्कृतीचे महत्त्व साऱ्या जगाला पटवून दिले आज अशा महान व्यक्तींची गरज आहे फक्त जयंती पुण्यतिथी आली की त्यांच्या फोटोचे पूजन न करता कायम त्यांच्या विचारांच्या प्रमाणे आचरण केले पाहिजे.
प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक यादव सर यांच्या हस्ते तर शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन ज्येष्ठ शिक्षक प्रकाश महिपाल सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कु. श्रावणी नलवडे कु. सृष्टी सुतार कु. अक्षदा भोई या विद्यार्थिनींची भाषणे झाली शिक्षक सुरेश पाटील यांचे भाषण झाले कार्यक्रमाचे नियोजन अस्मिता पाटील यांनी केले प्रास्ताविक सुरेश पवार यांनी केले तर आभार दिलीप पाटील-विंगकर यांनी मानले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक उपस्थित होते.
Comments
Post a Comment