वडगांव हवेली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत स्वछंदा जगताप यांची बिनविरोध निवड..
वडगांव हवेली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत स्वछंदा जगताप यांची बिनविरोध निवड..
कार्वे प्रतिनिधी:-
वडगांव हवेली ता.कराड येथील ग्रामपंचायतीच्या सदस्या ज्योती संदिप जगताप यांचे निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत स्वछंदा जगताप यांची बिनविरोध निवड झाली.
गत तीन महिन्यापूर्वी येथील ग्रामपंचायत सदस्या ज्योती संदिप जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झालेने त्यांच्या निधनानंतर सदर रिक्त जागेसाठी प्रभाग क्र. 5 मधुन सर्वसाधारण महिला या जागेसाठी शासकीय नियमानुसार पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन येथून स्वछंदा शिवाजी जगताप यांचा एकमेव अर्ज मुदतीत दाखल झालेने स्वछंदा जगताप बिनविरोध निवड झालेचे जाहीर झाले.
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करणेत आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव जगताप, सरपंच सुनीता जगताप, उपसरपंच राजेंद्र थोरात, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर केंगार, तंटामुक्ती अद्यक्ष जगन्नाथ जगताप, माजी उपसरपंच जयवंत जगताप, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र जगताप, भाऊसो जगताप, संतोष साळुंखे, विजय जगताप, इन्नूस मुजावर, जयवंत मुळे, धोंडीराम ठावरे, प्रशांत काटवटे संदीप जगताप, तलाठी आर. एम. जाधव,आनंदा शिंदे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी प्रभाकर केंगार यांनी तर आभार उपसरपंच राजेंद्र थोरात यांनी मानले.
Comments
Post a Comment