कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमध्ये निवड.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमध्ये निवड. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यावर उत्तम नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालय सतत कार्यरत असते. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयांमध्ये वेलनेस कॅम्पस ड्राईव्हमध्ये प्रशिक्षण आणि प्लेसमेंट याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुप्रिया धुळप, मारिया पटेल, पुनम पाटील, आकांक्षा चोरमारे, प्राजक्ता पवार, वैष्णवी मगदूम, प्रवीण साठे यांची वेलनेसच्या फार्मसी विभागात निवड करण्यात आली. या निवडी करण्यासाठी वेलनेसचे कार्यकारी एच आर अभिषेक परीट, सातारा विभागाच्या स्टोअर मॅनेजर सोनाली महामुनी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना अभिषेक परीट यांनी मार्गदर्शन केले व वेलनेस विषयी माहिती दिली. यावेळी निवड करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसू...