संकल्प सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न.

 संकल्प सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न.

कराड - प्रतिनिधी.

संकल्प सार्वजनिक वाचनालय कार्वेनाका  गोळेश्वर ता. कराड मध्ये डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 15 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या जन्म दिवसा निमित्त वाचन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने वाचनालयास ज्यानी पुस्तके भेट दिली त्या लोकांचा संकल्प वाचनालयातर्फे ट्राॅफी आणि सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.प्रतिमेचे पूजन शिवार पुस्तकांचे लेखक प्रा.जयराम गारगोटे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इमाम अकबर मुलानी हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.जयराम गारगोटे होते. कार्यक्रमाचे आभार सौ.रेशमा दुपटे यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .