आझाद विद्यालय, कासेगावच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.
आझाद विद्यालय, कासेगावच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.
कासेगाव : प्रतिनिधी.
आझाद विद्यालय, कासेगाव येथे इ.स. २००६–०७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा सोहळा शाळेच्या परिसरात आनंदमय वातावरणात साजरा झाला.कार्यक्रमाला एस. टी. आडके सर, गोंदिले सर, डी. आर. खोत सर, दिंडे सर, आर. पी. मोहिते सर, पी. टी. पाटील सर, जे. बी. खोत सर, एस. बी. माने सर, बी. एस. पाटील सर, मोरे सर, गुरव सर व हजारे सर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला भावनिक आणि संस्मरणीय रंग प्राप्त झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्निरुध गावडे यांनी केले, सूत्रसंचालन व स्वागत प्रा. दिपक पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमित पवार यांनी मानले.या स्नेहमेळाव्याचे आयोजन २००६–०७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व उत्तम रीतीने केले. जुन्या मित्रांची भेट आणि शिक्षकांसोबतच्या आठवणींनी सगळ्यांना भावनिक केले. या स्नेहमेळाव्याने विद्यार्थ्यांच्या मनात पुन्हा शालेय दिवसांच्या गोड आठवणींना उजाळा मिळाला.

Comments
Post a Comment