आधुनिक काळात मोडी लिपीचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज:- मा. मानसिंगराव कुमठेकर
आधुनिक काळात मोडी लिपीचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज:- मा. मानसिंगराव कुमठेकर
कराड - प्रतिनिधी.
14 ऑक्टोंबर 2025 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे इतिहास विभाग व मिरज इतिहास संशोधन मंडळ मिरज सामंजस्य करारा अंतर्गत मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग उद्घाटन आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. मानसिंगराव कुमठेकर अध्यक्ष मिरज इतिहास संशोधन मंडळ मिरज हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाची दुसरी बॅच बाहेर पडते व तिसऱ्या बॅचच्या उद्घाटन प्रसंगी खूप आनंद होत आहे. आधुनिक काळामध्ये मोडी लिपीचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी महाविद्यालय इतिहास विभाग व इतिहास संशोधन मंडळ मिरज यांच्या माध्यमातून मोडी लिपी प्रशिक्षण व संवर्धनाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. प्रशासकीय कामांमध्ये अत्यंत जुनी व महत्त्वाची कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. त्यामुळे या लिपीचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोडी लिपीचे ज्ञान दिले तर रोजगार देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आज ज्यांनी कोर्स पूर्ण केला त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो व तिसऱ्या बॅच साठी प्रवेश घेतलेल्या सर्वांना शुभेच्छा देतो!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा दोन्ही बॅचचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे व तिसऱ्या बॅच साठी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ही आनंदाची बाब आहे. प्रशासकीय व सांस्कृतिक दृष्ट्या मोडी लिपीचे जतन संवर्धन झाले पाहिजे.
कार्यक्रमात दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी श्री. उदय कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महाविद्यालयास वस्तुरूपी मदत करण्याचे जाहीर केले. तसेच माधुरी देवरे, सुशांत इनामदार, राजेश पाडळे, विवेक कुराडे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय इतिहास विभाग प्रमुख प्रा. सचिन बोलाईकर यांनी केले. आभार प्रा. युवराज कापसे यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. शितल उबाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment