कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.
कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील दिक्षा साबळे व ऋतुजा धुमाळ या विद्यार्थिनींनी आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, सांगली येथे घेण्यात आलेल्या स्टेट लेवल मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला त्यांनी मायोकार्डियल इन्फ्राक्शन या विषयावरती मॉडेल सादर केले होते. यावेळी त्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या विद्यार्थिनींना मार्गदर्शन प्रा. मोनिका शिंदे व प्रा. पूजा भोसले यांनी केले.या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
.jpg)
Comments
Post a Comment