कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म.) घोगाव महाविद्यालयास रील स्पर्धेत यश

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म.) घोगाव महाविद्यालयास  रील स्पर्धेत यश

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयास रील स्पर्धेत यश. एपीटीआय महाराष्ट्र यांच्या सहकार्याने अनिल अलीअस पिंटू मगदूम मेमोरियल  फार्मसी कॉलेज, धरणगुट्टी ता. शिरोल जि. कोल्हापूर येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील रील स्पर्धेमध्ये  प्रा. तेजस्वी कांबळे व लॅब टेक्निशियन पल्लवी माने यांनी  तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी या रीलसाठी थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट हा विषय निवडला होता. श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .