कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे इसेंटल स्किल फॉर मेडिकल रिप्रेझेंटेटिव या विषयावरती महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी विनायक कळंत्रे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ते सध्या अल्टीस रेमीडीज प्रा. लि. नवी मुंबई येथे कार्यरत आहेत.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फार्मासिस्ट झालेल्या सध्याच्या तरुण मुलांनी मार्केटिंग कसे करावे, त्याच्यासाठी काय गुण असणे आवश्यक आहेत तसेच कोणती कौशल्य असणे आवश्यक आहेत  याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा भोसले व आभार प्रा. अरुणा परीट यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .