येवतीतील भैरवनाथ देवाची शुक्रवारी दि. ७ रोजी यात्रा.

 येवतीतील भैरवनाथ देवाची  शुक्रवारी दि. ७ रोजी यात्रा.

उंडाळे -प्रतिनिधी.

 येवती ता. कराड येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा गुरुवार दिनांक ६ रोजी भरत असून यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार दिनांक ७ रोजी आहे ,गुलाल खोबरे व छबिना व भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली ,भैरवनाथ देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र सह कर्नाटकातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात, कराड दक्षिण मधील सर्वात मोठी यात्रा येवती गावात भरते, जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले या भैरवनाथ देवाच्या यात्रेचा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो, गुरुवार दिनांक ६ रोजी पहाटे अभिषेक, होम हवन, सत्यनारायणाची महापूजा,व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. शुक्रवार दिनांक ७ रोजी पहाटे ५ वाजता भव्य छबिना गुलाल खोबरे 12 ते 3 संस्कृतिक कार्यक्रम दुपारी 3 वाजता  कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे ,या कुस्ती मैदानात नामवंत मल्लांचे कुस्ती मैदान होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .