कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे ओव्हरविव्ह ऑन जेनरिक प्रोडक्शन डेव्हलपमेंट या विषयावरती सायन्स अँड टेक्नॉलॉजी नोवार्टिस हेल्थकेअर प्रा.लि.चे असोसिएटेड डायरेक्टर अभय वैद्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जेनरिक औषधाचे फायदे काय आहेत, जेनरिक औषधे आणि नामांकित औषधे यांच्यामध्ये फरक काय आहे, त्यांचे महत्त्व काय आहे, कोणकोणत्या कंपनी जेनरिक औषधाचे उत्पादन करतात याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट यांनी मानले.

Comments
Post a Comment