महिला महाविद्यालयामध्ये आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

 महिला महाविद्यालयामध्ये आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

कराड - प्रतिनिधी.

शिक्षण मंडळ कराड, संचालित महिला महाविद्यालय कराडमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  जागतिक गुंतवणूक सप्ताह निमित्त शनिवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2025 रोजी आर्थिक साक्षरता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती प्राची मयेकर (सर्टिफाइड ट्रेनर SEBI) आणि श्रीमती मीनल मिस्त्री  (असिस्टंट मॅनेजर CGSI) या उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ हे उपस्थित होते. विशेष उपस्थिती  म्हणून डॉ. पराग सोनटक्के हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती प्राची मयेकर यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्व, आर्थिक नियोजन कसे करावे, बचत व गुंतवणूक कशाप्रकारे करावी, गुंतवणुकीची पारंपारिक व आधुनिक साधने या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रमुख अतिथी श्रीमती मीनल मिस्त्री यांनी ग्राहकांचे अधिकार आणि ग्राहक संरक्षण कायदा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी आर्थिक साक्षरतेची गरज, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक स्वावलंबनाचे महत्व याविषयी  मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेमध्ये अर्थशास्त्र विभागातील बी. ए. भाग तीन च्या विद्यार्थिनी कु. नम्रता भोसले, कु. नारायणी कांबळे, कु. वृषाली कांबळे यांनी आर्थिक साक्षरता या विषयावर तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रीमती रूपाली पवार यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा संजीवनी पट्टेबहादूर यांनी करून दिला तसेच कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. शंकर हजारे यांनी केले. प्रा श्रीमती शोभा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. अनिल सुतार आणि प्रा. विनोद सागरे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .