सातारा जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणीस उत्फुर्त प्रतिसाद
सातारा जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणीस उत्फुर्त प्रतिसाद
मलकापूर (कराड):- पदवीधर मतदार नोंदणी प्रसंगी तानाजीराव देशमुख,हणमंतराव जाधव,सतिष चांदे, प्रशांत यादव,तेजस सोनवले सुर्यकांत खिलारे व इतर
कराड/प्रतिनिधी : -
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीसाठी व्यापक जनजागृती अभियानाला सुरुवात झाली आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असून, तानाजीराव देशमुख हे सातारा जिल्हा नोंदणी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने शास्त्रीनगर येथे मतदान नोंदणी केंद्राची उद्घाटन करण्यात आले.
या अभियानाअंतर्गत “चला पदवीधर मतदार होऊ या!” हा प्रेरणादायी संदेश देत, पात्र नागरिकांना मतदार म्हणून नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील राहिवाशांना हे अभियान लागू असून, सन २०२२-२३ पर्यंत कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये, स्वहस्ताक्षरीत अर्जाचा फॉर्म व एक पासपोर्ट साईज फोटो,
आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र,
पदवी (डिग्री) प्रमाणपत्र अथवा अंतिम वर्षाचा गुणपत्रक, पत्त्याचा पुरावा म्हणून नावावर वीजबिल, घरपट्टी पावती, भाडेकरार, किंवा विवाह नोंदणीचा दाखला यांचा समावेश आहे.
शिक्षित वर्गाने लोकशाही प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेणे अत्यावश्यक आहे. पदवीधर मतदारसंघात प्रत्येक तरुण-तरुणीने आपले नाव नोंदवून जबाबदार नागरिक म्हणून मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले आहे.
यावेळी जन स्वराष्ट्रचे संपादक राजेंद्र मोहिते, मलकापूरचे माजी विरोधीपक्षनेते हणमंतराव जाधव,मध्यमंडल नोंदणी प्रमुख सतिष चव्हाण,भाजपचे मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, सुर्यकांत खिलारे, सतिश चांदे,सोशलमिडीयाचे
पंकज पाटील, विजय देशमुख, बुथ अध्यक्ष राजेंद्र शिंगण,प्रशात यादव,तेजस सोनवले, सुरज बांडगी, संतोष हिंगसे, नगरसेवक अण्णा काशिद,तानाजी साठे,मंगेश सुरवसे, सुनिल मगदुम,रामेश्वर पाटील,संतोष मगदुम,तोफिक आगा,प्रशांत मोहिते यांच्यासह पदवीधर व शिक्षक मतदारांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे आगामी निवडणुकांसाठी सुशिक्षित आणि सजग मतदारांची नवी फळी तयार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नव मतदारांनी मतदान नोंदणी करून घ्यावी.
- तानाजीराव देशमुख
(सातारा जिल्हा नोंदणी प्रमुख)

Comments
Post a Comment