जागतिक हृदय दिनानिमित्त राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी , कासेगाव येथे व्याख्यान संपन्न.
जागतिक हृदय दिनानिमित्त राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव येथे व्याख्यान संपन्न
शिराळा - प्रतिनिधी.
जागतिक हृदय दिनानिमित्त राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. चेतन एस. पवार (मुख्य वैद्यकीय अधिकारी, शरीररचना शास्त्र विभाग, KIMS कराड) यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. चेतन एस. पवार यांनी हृदय आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताण व्यवस्थापन आणि नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. तरुणांमध्ये हृदयरोगांचे वाढते प्रमाण आणि लवकर निदान होण्याची गरज यावर देखील प्रकाश टाकण्यात आला. डॉ. पवार यांचे व्याख्यान अत्यंत माहितीपूर्ण आणि फलदायी ठरले. या उपक्रमासाठी संस्थेचे आदरणीय सचिव प्राचार्य आर. डी. सावंत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमावेळी डॉ. अतुल आर. चोपडे, प्रा. श्री. एच. एस. कंदले, सौ. शैलजा कांबळे तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Comments
Post a Comment