पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार बहाल.
पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार बहाल.
साम टीव्ही चे संपादक निलेश खरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान.
कराड- प्रतिनिधी.
येवती ता. कराड येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दैनिक ललकारचे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांना राज्यस्तरीय स्प्राईड ऑफ स्पंदन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, पत्रकारिता क्षेत्रात शेवाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला, हा पुरस्कार सोहळा स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, यावेळी साम टीव्ही चे संपादक निलेश खरे व टीव्ही 9 च्या वृत्त निवेदिका सेजल पूरवार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी संस्थेचे संस्थापक संदीप डाकवे , सिने अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, दिग्दर्शक अरुण कचरे, सिने अभिनेता योगेश पोवार, सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, महंत अहिल्यागिरीचे महाराज, उपविभागीय अधिकारी लक्ष्मण मंडले यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला.

Comments
Post a Comment