Posts

Showing posts from June, 2022

जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर .

Image
  सातारा   जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक  कार्यक्रम जाहीर .               सातारा, दि. 30 : जानेवारी 2021 ते मे 2022 व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सातारा जिल्ह्यातील  एकूण 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकीकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये  सदर निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील असे उपजिल्हाधिकारी महसूल प्रशांत आवटे यांनी कळविले आहे.    कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे, मांगवाडी, आदर्शनगर, उत्तर तांबवे, कोयनावसाहत, पश्चिम उंब्रज, बेलवाडी, शितळवाडी, नाणेगांव बु. व फलटण तालुक्यातील  परहर बु. या एकूण 10 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.    निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येत...

आदरणीय स्व. पी.डी. पाटील यांच्या जयंतीदिनी प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Image
  आदरणीय स्व. पी.डी. पाटील यांच्या जयंतीदिनी प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन. कराड- प्रतिनिधी. येथील आदरणीय  पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने, दि. १ जुलै रोजी आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवार पेठ येथील निवासस्थानी, सकाळी ९ वाजता स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी, प्रतिष्ठानचे विश्वस्त व संयोजन समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तद्नंतर सर्व विश्वस्त आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या 'समाधीस्थळी' पुष्प अर्पण करण्यासाठी जाणार आहेत. प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा 'आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार' कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेली २ वर्षे स्थगित करण्यात आला होता. आता, २०२२ च्या पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत १ जुलै रोजी दुपारी ४ वाजता प्रतिष्ठानचे कार्यालय 'अनंत कॉम्प्लेक्स' मंगळवार पेठ, याठिकाणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पा...

एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ.

Image
  एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ. तळमावले/वार्ताहर आषाढी वारीचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डाॅ.संदीप डाकवे यांनी 34 सेमी बाय 20 सेमी या आकाराच्या एका पानावर संपूर्ण हरिपाठ लिहण्याचा प्रयत्न केला आहे. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत अभंग जास्त गायले जातात. डाॅ.संदीप डाकवे हे गेले काही वर्षापासून आषाढी वारीचे औचित्य साधून एक वेगळा, नावीण्यपूर्ण कलात्मक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदाचे वारीचे औचित्य साधून त्यांनी एका पानावर हरिपाठ लिहला आहे. यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी टी शर्टवर विठूरायाचे चित्र, मोरपिसावर संत तुकारामांचे चित्र, शब्दात विठ्ठलाच्या चित्रांचे रेखाटन, 16 फुट बाय 2 फुट आकाराच्या पोस्टरातून वारकऱ्यांना शुभेच्छा, घराच्या भिंतीवर 14 फूट बाय 6 फूट आकारात वारीचे भव्यदिव्य चित्र, अक्षर अभंग व...

पाटण येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु.

Image
 पाटण येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु.   सातारा दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह पाटण येथे  सन 2022-23 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इयत्ता 8 वी ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अन. जाती, अनु. जमाती, अनाथ व दिव्यांग या संवर्गातील  मुला-मुलींनी शासकीय वसतिगृह पाटण येथे त्वरीत संपर्क साधावा असे, गृहपाल शासकीय वसतिगृह पाटण यांनी कळविले आहे.  

सलतेवाडीच्या माऊली दिंडीला वारकऱ्यांचा वाढता प्रतिसाद.

Image
  सलतेवाडीच्या माऊली दिंडीला वारकऱ्यांचा वाढता प्रतिसाद . तळमावले/डाॅ.संदीप डाकवे अवघ्या 5 वारकरी यांच्यासह सुरु झालेल्या दिंडीमध्ये आज 100 हून अधिक वारकरी आणि भक्त सहभागी होत आहेत. हीच वारीची यशस्वीता आहे. श्री समर्थ सदगुरू योगीराज हरिहर महाराज यांच्या प्रेरणेतून माऊली दिंडी सलतेवाडी ता.पाटण येथून निघते. या गावात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदीर आहे, त्यामुळे या दिंडी ला "माऊली दिंडी" संबोधले जाते. दिंडीची सुरूवात सन 1988 साली श्री सदगुरू हरिहर महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने झाली. गावात माऊलीचे मंदिर आहे म्हणून महाराजांनी जशी आळंदीहून माऊलींची दिंडी निघते त्याच दिवशी आपल्या गावातूनही दिंडी निघावी ही महाराजांनी गावकऱ्यांना प्रेरणा दिली व प्रसाद दिला. दिंडी चालक म्हणून महाराजांचे शिष्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली सपकाळवाडी याची नियुक्ती करण्यात आली. सुरूवातीला पहिल्या वर्षी पाच वारकरी निघाले त्या पाचाचे आता शंभराच्या वरती वारकरी झाले आहेत. आज या दिंडीला 35 वर्षे पुर्ण झालीत. दिंडीमध्ये ह.भ.प.बाबूराव महाराज सलते व ह.भ.प.नारायण महाराज सलते यांच्या नियोजनातून कार्यक्रम राबवल...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे ऑनलाईन वेबिनार संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे  ऑनलाईन वेबिनार संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पोतदार यांचे नुकतेच ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले. त्यांनी एक्सप्लोरिंग द इंटरफेस बिटविन ड्रग डेव्हलपमेंट बायो.  इमॅजिंग अँड ड्रग डिलिव्हरी या विषयावरती  मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. पंकज पोतदार यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. यावेळी डॉ. पोतदार यांनी विविध प्रकारच्या औषधांचे संशोधन कसे केले जाते, ते कसे शोधले जाते त्यासाठीच्या विविध प्रक्रिया, प्रकल्प हे राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये कशा प्रकारे पार पडतात त्यासाठी लागणारी उपकरणे याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रा. दिप्ती पाटील यांनी केले.

८ ऑगस्ट ला अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन.

Image
  ८ ऑगस्ट ला अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन. चांदूर रेल्वे येथे अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक . गोंडवाना  न्यूज ब्युरो रीपोर्ट-  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी ची बैठक केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक शासकीय  विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीमध्येअ.भा. पत्रकार संघाचे एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन येत्या ८ ऑगस्ट ला राम गणेश गडकरी सभागृह, ठाणे येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून  केंद्रीय सचिव अशोक पवार,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, प्रदेश सरचिटणीस प्रा.रवींद्र मेंढे,महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगीवकर आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये पत्रकारांचे प्रश्न व समस्या यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी अखिल भारतीय पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन ८ ऑगस्ट रोजी राम गणेश गडकरी सभागृह,ठाणे येथे आयोजित केले असुन ...

शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकारी निवडी संपन्न.

Image
  शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षपदी खासदार सुप्रिया  सुळे उपाध्यक्ष पदी अशोकराव थोरात, एस टी सुकरे कार्यवाहपदी निवड. कराड - प्रतिनिधी.   महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथे नुकतीच संपन्न झाली. सभेत पुढील पाच वर्षासाठी  सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री  विजय नवल पाटील होते. सभेत उपाध्यक्षपदी कराडच्या अशोकराव थोरात यांची तर कार्यवाह पदी एस.टी.सुकरे यांची निवड झाली आहे.       विजय नवल पाटील हे गेली 10 वर्षे महामंडळाचे अध्यक्ष होते. तत्पूर्वी  देविसिंह शेखावत गोविंद भाई श्राफ, मधुकरराव चौधरी अध्यक्ष होते .दिवंगत वसंतदादा पाटील हे पहिले संस्थापक अध्यक्ष होत. विजय नवल पाटील यांनी गेली दहा वर्षे महामंडळाचा विस्तार करून शिक्षण संस्थांचे म्हणजेच विद्यार्थी,पालक, शिक्षक, कर्मचारी यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. विजय नवल पाटील पुढील कालावधीत कार्याध्यक्ष म्हणून काम करणार असून सुप्रिया सुळे यांचे समवेत मह...

स्वराज्य पोलीस मित्र संघटना सातारा शहर शाखेचा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात संपन्न.

Image
  स्वराज्य पोलीस मित्र संघटना सातारा शहर शाखेचा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात संपन्न. सातारा: प्रतिनिधी. (सागर पाटील.) भारत सरकार मान्यताप्राप्त स्वराज्य पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सातारा शहर शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात सातारा येथे पार पडला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी  आणि न्यायहक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणून आज स्वराज्य पोलीस मित्र संघटना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणारी,समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणारी स्वराज्य पोलीस मित्र संघटना म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आलेली आहे.आज या संघटनेच्या संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो शाखा मोठया तळमळीने समाजसेवेचा वारसा अखंडपणे चालवत आहेत.संपूर्ण भारतात कार्यक्षेत्र असलेली एकमेव पोलीस मित्र संघटना म्हणून स्वराज्य पोलीस मित्र संघटना ओळखली जाते.अन्यायाला वाचा फोडणारी आणि लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या संघटनेचा सातारा शहर शाखेचा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात  जल्लोषात पार पडला. यावेळी स्वराज्य पोलीसमित्र संघटना संस्थापक /...

सौ . गीता पाठक यांना आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार.

Image
 सौ . गीता पाठक यांना आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार. कराड - प्रतिनिधी.   पुणे येथील काव्य मित्र संस्थेच्या वतीने सौ गीता पाठक यांना राष्ट्रीय आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. गीता पाठक या गेल्या पंचवीस वर्षांपासून नाट्य व सिनेअभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण पातळीवरील अनेक  नाटकातून काम केले आहे. राज्य नाट्य एकांकिका, मराठी मालिका, व सिनेमा असा त्यांचा प्रवास सुरू आहे. गेली चार वर्षापासून त्या व्यसनमुक्तीचे काम करतात. आज पर्यंत शंभर हून अधिक लोक त्यांच्या या कार्यामुळे व्यसन मुक्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर, डॉक्टर जयश्री घोडके, जगदीश थोरवे, डॉक्टर वंदना वाहुल, भाऊसाहेब जंजिरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी काव्य मित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सागर, संजय जगताप, हरिनाथ कांबळे, उपस्थित होते. त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन केले जात आहे यामध्ये महासोली येथील  जय हनुमान नाट्य मंडळाचे अंजीरराव सूर्यवंशी यांसह विविध संस्थांनी त्यांचे अभ...

मनोज माळी यांचा सत्कार.

Image
  मनोज माळी यांचा सत्कार. कराड - प्रतिनिधी. प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने स्व सौ वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील गैरसोय बाबत मनोज माळी , भानुदास डाईनगडे दिनांक ०५.०५.२०२२ पासून आमरण उपोषण चालू होते या उपोषणास ची दखल घेऊन रुग्णालयात बरेच असुविधा दूर केल्या आहेत तरी या सामाजिक कार्याची दखल घेऊन मा अनिल बापू घराळ शेतकरी संघटना, सौ वैशाली जाधव प्रदेश सरचिटणीस काँग्रेस , सौ स्वाती पिसाळ भाजपा महिला जिल्हाध्यक्ष,  मुल्ला मॅडम ग्रामपंचायत सदस्य सैदापूर , मनीषा थोरात  ह्यूमन राईट कराड शहर अध्यक्ष , सौ स्वाती जाधव , प्रसाद पाटील , जयवंत पाटील विभाग प्रमुख शेतकरी संघटना ,विवेक कुराडे यांनी सत्कार केला.

सौ. उषाताई जाधव यांची निवड.

Image
  सौ. उषाताई जाधव यांची निवड . सातारा जिल्हा कॉम्प्युटर टायपिंग शॉर्ट हॅन्ड इन्स्टिट्यूट ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी. सातारा - प्रतिनिधी. सामाजिक कामाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात आवड असलेल्या सौ उषाताई जाधव मॅडम यांची सातारा जिल्ह्याच्या कॉम्प्युटर टायपिंग शॉर्ट हॅन्ड इन्स्टिट्यूट ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष पदी निवड झाली. शून्यातून आपली प्रगती करत यांनी समाजात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. या जबाबदारी बरोबरच त्या कराडमधील साधना कम्प्युटरच्या प्राचार्या, महा जनहित प्रतिष्ठान पुणे सदस्य, ग्रामपंचायत सोनाईचीवाडी सदस्य अशा महत्त्वाच्या पदावरही त्या काम करतात आहेत त्यांच्या या वरील निवडीबाबत अनेक सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्या या निवडीबाबत अभिनंदन करण्यात आले.

शिक्षक गटातून श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथील उपशिक्षक लक्ष्मण उबाळे यांच्या उपकरणाची निवड.

Image
  शिक्षक गटातून श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथील उपशिक्षक लक्ष्मण उबाळे यांच्या उपकरणाची निवड. कार्वे प्रतिनिधी :- (प्रविण पाटील) दिनांक 15 जून ते 17 जून रोजी Science And Innovation Activity Center Baramati यांच्या उदघाटनाचे आवचित साधून राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन शारदा नगर बारामती येथे आयोजित करण्यात आले होते . विद्यार्थी गटातून साहील जाधव व आदित्य जाधव यांच्या उपकरणाची निवड करण्यात आली. तर शिक्षक गटातून श्री लक्ष्मण उबाळे यांच्या अपंग व वृद्ध व्यक्ती यांच्या साठी बहुउद्देशीय रिमोट या उपकरणाची निवड करण्यात आली . यावेळी त्यांना राजेंद्र पवार व जेष्ट उद्योजक परांजपे यांच्या हास्ते प्रशस्तीपत्र , सन्मानचिन्ह व एक झाड देऊन गौरवण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव , सचिव तुकाराम आण्णा जाधव , संचालक भूजंगराव जाधव , प्रभाकर गाडगीळ व प्राचार्या श्रीमती विभा सावळे यांनी अभिनंदन केले .

सुषमा पेडणेकर नारकर यांचे निधन.

Image
  सुषमा पेडणेकर नारकर यांचे निधन.      येवती - प्रतिनिधी. येवती ता कराड येथील   महिला वाहक सुषमा पेडणेकर यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. कराड तालुक्यातील पहिल्या महिला वाहक होत्या त्यांच्या पश्चात, आई ,वडील, मुलगा, भाऊ असा परिवार आहे येवती येथील सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या महिला सदस्य होत्या.

पानवळवाडी येथे वटपौर्णिमेच्या दिवशीच विधवा प्रथेविरुध्द क्रांतीकारक निर्णय.

Image
  पानवळवाडी येथे वटपौर्णिमेच्या दिवशीच विधवा प्रथेविरुध्द क्रांतीकारक निर्णय. तळमावले/वार्ताहर पतीच्या निधनानंतर हळदीकुंकू पासून दूर असलेल्या, पंच्याहत्तरीतील आजीनींही हळदीकुंकू लावून तेवढ्या वरच न थांबता वडालाही फेऱ्या मारून विधवा प्रथेला मुठमाती दिली. पाटण तालुक्यातील मालदन गावच्या पानवळवाडी या छोट्याशा वस्तीत तब्बल 19 विधवा महिलांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतल्याने ग्रामस्थानीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी आयोजित केलेल्या या सोहळयात मात्र उपस्थित सर्वांच्याच आश्रुंचा बांध फुटला तरही ही चळवळ अखंडीत चालू ठेवण्याचा निर्धार येथील सर्वच महिलांनी केला. पाटण तालुक्यातील पानवळवाडी ही मालदन ग्रामपंचायतीची छोटीशी वस्ती. बहुतेक कुटुंबे कामाधंद्यानिमीत्त परगावी. तर वस्तीवर काही ठरावीक कुंटुंबेच वास्तव्य करतात. गावात एखादा कार्यक्रम असला तर सुवासिनीची संख्या खुपच कमी. त्यामुळे येथील लोकांनी हेरवाड पटर्नचा आधार घेतला. नुकताच शासनाने ही याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याचा अधार घेत येथे असलेल्या विधवा महिलांमध्ये प्रबोधन चालू झाले. यासाठी प्रा.ए.बी.कणसे, लक्ष्मण कदम यांनी पु...

ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन.

Image
 ‘ ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन. तळमावले/वार्ताहर ग्रामीण विभागातील दुर्गम व खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजू, होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना ‘ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी समाजातील जास्तीत जास्त लोकांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. लोकसहभागातून नेहमीच नावीण्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चा हातखंडा आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये ज्ञानाची शिदोरी उपक्रमामधून रु.28,100/- किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप, एक वही एक पेन उपक्रमांतर्गत रु.16,000/- किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप, माणुसकीच्या वहया उपक्रमामधून रु.11,000/- किमतीचे शालेय साहित्य वाटप, ग्रंथतुलेतून रु.11,000/- किमतीची पुस्तके वाटप, डाकेवाडी ...

काले.ता-कराड येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न.

Image
  राजकारणाचा पाया हा स्थानीक स्वराज्य संस्था आसल्यानेच त्या मध्ये कार्यकर्त्यांनी लक्ष दिले तरच सत्ता  मिळेल .                              ____चंद्रकांत खंडाईत        कराड - प्रतिनिधी. देशाच्या व राज्याच्या एकूणच राजकारणाचा तसेच सत्ताकारणचा मुळ पायाच ग्रामपंचायत, सोसायटी, नगरपंचायत नगरपरीषद ,महानगरपालीका, जिल्हा परीषद, पंचायत समीती या स्थानीक स्वराज्य संस्था असल्याने आंबेडकरी चळवळीतील कींवा वंचित समुहातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कटाक्षाने लक्ष देऊन या निवडणूका लढल्या पाहीजेत आणि तेथील सत्ताकारणात जाऊन सत्ता केंद्राचा  पाया भक्कम केल्या शिवाय संपुर्ण राजकीय सत्ता घेता येणार नाही.त्यासाठी स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाकडे कार्यकर्त्यांनी कटाक्षाने लढवण्याची गरज आसल्याचे मत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आयु.चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले.          वंचित बहुजन आघाडी तालूका कराड (दक्...

कराड नगरपालिका आरक्षण सोडत जाहीर.

Image
कराड नगरपालिका आरक्षण सोडत  जाहीर. कराड - प्रतिनिधी. *▪️ प्रभाग क्रमांक 1* अ- सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 2* अ- सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 3* अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 4* अ- अनुसूचित जाती महिला ब-सर्वसाधारण *तरूण भारत अपडेट* *▪️प्रभाग क्रमांक 5* अ- सर्वसाधारण महिला ब- अनुसूचित जाती  *▪️प्रभाग क्रमांक 6* अ- सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 7* अ- सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 8* अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *तरूण भारत अपडेट* *▪️प्रभाग क्रमांक 9* अ -सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 10* अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 11* अ- अनुसूचित जाती महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 12* अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 13* अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 14* अ- सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण *▪️प्रभाग क्रमांक 15* अ- अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण महिला क- सर्वसाधारण महिला

रेठरे बुद्रुक आरोग्य केंद्रात साथरोग जनजागरण अभियान.

Image
  रेठरे बुद्रुक आरोग्य केंद्रात साथरोग जनजागरण अभियान. कराड - प्रतिनिधी. पावसाळा चालू झाल्याने शासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या असून पूर्व खबरदारी म्हणून जनजागृती चालू केली आहे.                  साथरोग जनजागरण अभियान  प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बुद्रुक अंतर्गत सर्व गावांमध्ये  दि.1/6/2022 पासून  वैद्यकीय अधिकारी डॉ अनिता कदम व डॉ किरण धायगुडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली  सी एच ओ  आरोग्य सहाय्यक  आरोग्य सेवक  आरोग्य सेविका  गटप्रवर्तक व  आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून साथरोग,हिवताप जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे या मोहिमेदरम्यान जिल्हा हिवताप अधिकारी सातारा श्रीमती अश्विनी जंगम  मॅडम यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्यासमवेत भेट देऊन माननीय सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून जलजन्य व किटकजन्य आजारा संदर्भात मार्गदर्शन केले तसेच प्रा.आ. केंद्रातील कर्मचारी यांनी  गावातील पाणीपुरवठा योजनेची पाहणी, ओटी टेस्ट ब्लिचिंग पावडर पाहणी ,कंटेनर सर्वे, हर घर ...

"साने गुरुजी हे भारताला लाभलेले संवेदनशील साहित्यिक होते" प्रा.दादाराम साळुंखे.

Image
   "साने गुरुजी हे भारताला लाभलेले संवेदनशील साहित्यिक होते"        प्रा.दादाराम साळुंखे. कराड:- सैदापूर विद्यानगर येथील समाजभुषण बाबुराव गोखले ग्रंथालयात साने गुरुजी यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा.दादाराम साळुंखे म्हणाले,"मानवता हाच खरा धर्म आहे असे सांगणारे सानेगुरुजी एक उत्कृष्ट साहित्यिक होते.त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले.'मानवजातीची कथा' हे त्यांनी भाषांतरित केलेले पुस्तक साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणारे आहे. त्यांच्या साहित्यामध्ये समाजसुधारणा,मानवतावाद, देशभक्ती, संस्कार भरभरून आले आहेत. भारताला विविध क्षेत्रात बलशाली करुन विश्वात तो सर्वांच्या पुढे असेल असे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यांनी आपले बहुतेक लेखन देशासाठी तुरुंगात असताना केले.'श्यामची आई' ही आत्मकहाणी त्यांनी तुरुंगात असताना लिहिली. त्याच्या जवळपास तीन लाखाच्यावर प्रती समाजापर्यंत पोहचल्या आहेत.मातेबद्दल असणाऱ्या प्रेम,भक्ती,कृतज्ञता अशा अपार भावना यामध्ये आल्या आहेत. श्यामची आई हे पुस्तक नसून समाजासाठी संस्कार ग्रंथ आहे.समाजासाठी प्रेरणादायी साहित्याची...

कराडच्या कृषी दूतांचे बहे येथील शेतकर्‍यांना मार्गदर्शन.

Image
  कराडच्या कृषी दूतांचे बहे येथील शेतकर्‍यांना मार्गदर्शन. मलकापुर / प्रतिनिधी. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रेठरे बुद्रुक  येथील कृषी   महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाळवा तालुक्याल बहे येथील शेतकर्‍यांची भेट घेऊन वृक्ष लागवडी संदर्भात केले मार्गदर्शन यावेळी सरपंच छायाताई पाटील,उपसरपंच डाॅ.सुवर्णा पाटील, मा.सरपंच बी.जी.पाटील विठ्ठल पाटील,जयकर पाटील यांची उपस्थिती होती.   निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच प्राणवायु देणार्‍या वृक्षांची लागवड  संवर्धन करणे मोलाचे आहे. किंबहुना ती काळाची गरजच आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या बांधावर व उपलब्ध जागेमध्ये वृक्ष लागवड केली पाहिजे असे कृषी दुतांनी शेतकर्‍यांना पटवून सांगितले. तसेच शेती क्षेञांमध्ये नवनविन तंञज्ञान विकसीत झाले असुन त्याचा वापर करुन शेतकर्‍यांनी अधूनिकतेची कास धरावी असे आवाहन कृषी मंडळ अधिकारी विवेक ननावरे यांनी केले. यावेळी कृषी  सहाय्यक जयदिप पाटील कृषीदूत धैर्यशील जाधव,अभिषेक मोरे, सत्यजित पाटील,वैभव पाटील,योगेश पाटील आदित्य थोरात,भास्कर जाधव, दिपक भिलवडे, यांची उपस्थिती ...

बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार.

Image
  बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार.   बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील.  कराड, दि. 9 (प्रतिनिधी) -  बळीराजा शेतकरी संस्था या नावाने काहींनी संस्था रजिस्टर केली आहे. त्यांनी त्यांच्या संस्थेचा वापर करावा मात्रा बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला . गेल्या आठ दिवसापासून बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. त्या पाश्वभूमीवर संघटनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी जी काका पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव खबाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले, राज्यात शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी पिळून निघतो आहे. शेतकर्‍याला न्याय मिळावा यासाठी बळीराजा शेतकरी संघटना नेहमीच काम करत आली आहे. मात्र ...

रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये याची दक्षता कृषी अधिकार्यांनी घ्यावी.

Image
          रासायनिक खतांचा कृत्रिम   तुटवडा निर्माण होऊ नये याची दक्षता कृषी   अधिकार्यांनी घ्यावी.     साजिद मुल्ला युवा प्रदेशाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना. कराड - प्रतिनिधी.      खरीप  हंगाम तोंडावर आला आहे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे शेताची मेहनत करून तयार आहे पंचायत समिती मध्ये सवलतीच्या दरामध्ये बि बियाणे मिळत आहेत गरजू शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे पंचायत समिती मध्ये शेती विभागामध्ये जमा करून योजनेचा लाभ घ्यावा अधिकारी जर शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असतील तर आमच्या स्टाईल ने अधिकार्यांना धडा शिकवू  रासायनिक खतांचा क्रुत्रिम तुटवडा निर्माण करून दुकानदार शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील क्रुषी अधिकार्यांनी सावधान बाळगावी रासायनिक खतांचा क्रुत्रिम तुटवडा निर्माण करणार्यां दुकानदारांच्या वर क्रुषी विभागाने कडक कारवाई करावी  अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील क्रुषि विभागाच्या  कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्...

१९९८-९९ सालच्या १० वी च्या विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा .

Image
महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पुसेसावळी येथे  १० वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा  उत्साहात साजरा . सातारा - प्रतिनिधी. महात्मा गांधी विद्यालय ज्युनिअर आणि कॉलेज पुसेसावळी येथील १९९८-९९ दहावी बॅच चा स्नेहमेळावा बोरगाव येथे आनंद कृषी पर्यटन केंद्र येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाचे आयोजन श्री. सचिन शिंदे  यांनी केले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संतोष झेंडे , उपाध्यक्ष सौ.सरिता कदम सूर्यवंशी, सचिव श्री.विकास कांबळे, खजिनदार श्री.विठ्ठल मायने व उपस्थित सर्व १९९८- ९९  बॅच विद्यार्थी श्री.प्रवीण कारंडे, श्री. अंकुश घाडगे श्री. संतोष कांबळे श्री. आप्पा लोहार श्री. कैलास कदम श्री विशाल गुरव श्री विनायक कदम श्री अशोक माने श्री प्रशांत होळकर श्री राजेंद्र जाधव सौ लतिका कदम शिंदे सौ सारिका कुंदप रनभरे हे उपस्थित होते सूत्रसंचालन श्री सचिन शिंदे यांनी केले व श्री विकास कांबळे यांनी आभार व्यक्त केले.

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून .

Image
  अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून . प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा, खड्डा काडून मृतदेह पुरला. कराड,दि. 4 (प्रतिनिधी) - वहागाव ता. कराड येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने निर्घृण खून केला.  तसेच शेतात जेसीबीने पंधरा फुट खोल खड्डा काढून मृतदेह पुरून टाकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. पोलिसांनी खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढला असून रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कार्यवाही सुरू होती. बरकत पटेल (वय 30, रा. वहागाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वहागाव येथील बरकत पटेल हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार चार दिवसांपुर्वी तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांकडून त्याबाबतचा तपास सुरू होता. दरम्यानच्या कालावधीत बरकतच्या पत्नीचे एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बरकतच्या पत्नीचे गावातीलच एका युवकाशी अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती बरकतला मिळाली होती. त्यामुळे तो पत्नी व त्या युवकाशी वाद घालत होता. पती आपल्या ...

उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांची खाजगी सेंटरमध्ये मोफत सोनोग्राफी.

Image
  उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांची खाजगी सेंटरमध्ये मोफत सोनोग्राफी. 8 सोनोग्राफी सेंटरचा सहभाग, दररोज दोन सेंटरमध्ये सहा रूग्णांची होणार सोनोग्राफी.                  _______मनोज माळी यांच्या आंदोलनाचे यश कराड- प्रतिनिधी   कराडच्या सौ.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातुन पाठवण्यात येणाऱया दररोज सहा रूग्णांची खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये मोफत सोनोग्राफी करण्यात येणार आहे. तर उपजिल्हा रूग्णालयातील मशिनव्दारे आठवडयातील दोन दिवस सोनोग्राफीची सेवा सुरू रहाणार आहे. प्रहारचे मनोज माळी यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शहरातील रडिओलॉजिस्ट व आरोग्य प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात या सेवेस प्रारंभ झाला आहे.    उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयीबाबत प्रहारचे मनोज माळी यांनी उपजिल्ह रूग्णालयाच्या प्रवेशव्दारात सात दिवस उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन आरोग्य मंत्र्यांच्या वतीने मंत्रालयात बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. या बैठकीत उपजिल्हा रूग्णालयातील बहुतांष गैरसोयी दुर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उपजिल्हा...

काराडला वडगाव हवेली व चरेगाव गट वाढले.

Image
  काराडला वडगाव हवेली व चरेगाव गट वाढले. कराड/ प्रतिनिधी कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात कराड तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांची वाढ झाल्याने  जिल्हा परिषदेचे चौदा गट व पंचायत समितीचे अठ्ठावीस गण झाले आहेत. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण त्यामधील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे ः पाल गट ः पाल गण ः पाल, भगतवाडी, हरफळवाडी, करंजोशी, शिरगाव, वाजेवाडी, आदर्शनगर, वडगाव उंब्रज, भांबे, मरळी, धावरवाडी इंदोली गण ः इंदोली, मस्करवाडी, चोरजवाडी, डफळवाडी, सावरघर, साबळेवाडी, कोरीवळे, चेारे, साखरवाडी, हिंगनोळे, भोसलेवाडी, पेरले उंब्रज गट ः उंब्रज गण ः उंब्रज, गोडवाडी, नाणेगाव बुद्रुक, कळंत्रेवाडी कोर्टी गण ः कोर्टी, भुयाचीवाडी, कवठे, नवीन कवठे, धनकवडी, वडोली भिकेश्‍वर, कालगाव, खराडे, चिंचणी, कोणेगाव, बेलवाडी मसूर गट ः किवळ गण ः हेळगाव, पाडळी हेळगाव, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हणबरवाडी, कचरेवाडी, निवडी, किवळ, घोलपवाडी, खोडजाईवाडी, चिखली, वाण्याचीवाडी मसूर गण ः मसूर, यादववाडी, माळ...