Posts

Showing posts from April, 2025

महाबळेश्वर महापर्यटन धर्तीवर वाहतूक मार्गात बदल.

Image
  महाबळेश्वर महापर्यटन धर्तीवर वाहतूक मार्गात बदल. सातारा:- जि.मा.का.  2 ते 4 मे या कालावधीत महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025 हा जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विकास महामंडळामार्फत महाबळेश्वर येथे आयोजित करणेत आला आहे. महोत्सव कालावधीत महाबळेश्वर हद्दीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून महोत्सवास महाराष्ट्र राज्यातुन मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता असून व्ही. व्ही. आय.पी व व्ही.आय.पी हे सुध्दा पर्यटन महोत्सव कार्यक्रमास भेट देणार आहेत. महाबळेश्वर-पांचगणी रोड अतिशय अरुंद असल्याने व घाट रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी व वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने महोत्सव कालावधीत वाई बाजुकडुन पांचगणी-महाबळेश्वरकडे जाणा-या व महाबळेश्वर पाचगणी बाजूकडुन वाई-सातारा बाजूकडे जाणा-या नागरीकांची व वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणुन 2 ते 4 मे या कालावधीत डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा तथा, प्रभारी पोलीस अधीक्षक, सातारा यांनी वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्याकरीता अधिसुचना पारित केली आहे. वाहनांच्या वाहतुक मार्गातील बदलाबाबत वाहतुक ...

अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीवर भर देणार.

Image
  अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीवर भर देणार.        -अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान. • अल्पसंख्याकांच्या शाळांत अपात्र शिक्षक आढळून आल्यास संस्थांवर कारवाई • अल्पसंख्याक मुला- मुलींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील • उर्दू शाळांमध्ये मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न कोल्हापूर, दि.29 (जिमाका): अल्पसंख्याक समाजात मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व इतर धर्मांचाही समावेश होतो. देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी या समाजाच्या मुला मुलींसाठी सर्वसमावेशक शिक्षण पद्धती राबवण्यावर भर देण्यात येणार असून तसे पत्र शासनाकडे पाठवण्यात आल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) प्यारे जिया खान यांनी केले.      अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाचा आढावा अध्यक्ष श्री खान यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे ...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालय परिसरातील विकास कामे जलदगतीने करा.

Image
  राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालय परिसरातील विकास कामे जलदगतीने करा.       -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश. नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी होण्यासाठी नियोजनबद्ध काम करा. कोल्हापूर दि.28 (जिमाका):  शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील कामे तसेच सीपीआर रुग्णालयातील विकास कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करा. नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी होण्यासाठी नियोजनबद्ध काम करा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.     शेंडा पार्क परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात रस्ते बांधिव गटर व फूटपाथचे काम, जमीन सपाटीकरण व सुशोभीकरण, बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्टचे बांधकाम, फॉरेन्सिक विभागाची इमारत, 125 निवासी डॉक्टर्स व 125 आंतरवासिता (महिला व पुरुष) यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहाची इमारत,  150 परिचारिकांसाठी वसतीगृह व वार्षिक 100 क्षमतेचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, विद्युत व फर्निचर क...

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटलचे सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

Image
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटलचे  सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी.  कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल, जुळेवाडी आणि मा.आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातू साळशिरांबे ता.कराड येथे मोफत सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.कार्यक्रमाचे उदघाटन कराड दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष मा.श्री.प्रविण साळुंखे यांच्या हस्ते पार पडले, यावेळी डॉ.संग्राम पवार, साळशिरंबे गावातील माजी उपसरपंच मा.श्री.वसंतराव मोहिते (डेपोटी), माजी उपसरपंच मा.श्री.जयवंतराव यादव (आबा), भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष श्री.पंकज पाटील, श्री.राजेंद्र पाटील, बुथ अध्यक्ष मा.तानाजी पवार, श्री.हणमंत पाटील, श्री.सुभाष चवरे, श्री.हणमंत यादव, डॉ.युवराज पाटील, श्री.दत्तात्रय पाटील, मा.गणेश यादव, श्री.गणेश साठे, मा.विराज पाटील, मा.आकाश पाटील, सुमित पाटील व गावातील जेष्ठ ग्रामस्थ, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

मा.अनिकेतभाऊ साळुंखे यांचा अजंठा रिक्षा युनियन तर्फे सत्कार.

Image
  मा.अनिकेतभाऊ साळुंखे यांचा अजंठा रिक्षा युनियन तर्फे सत्कार. कराड -प्रतिनिधी.  कराड येथील अजंठा रिक्षा युनियन तर्फे फकिरा पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अनिकेतभाऊ साळुंखे यांचा सत्कार मा.संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.   वंचित, शोषित सामाजातील नागरिकांच्या साठी निस्वार्थपणे कार्यरत असल्याबद्दल तसेच पुढील काळात अधिक स्फूर्तीन काम कराव ही शक्ती निर्माण व्हावी यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन केलं गेलं होतं. यावेळी अजिंठा रिक्षा गेटचे अध्यक्ष मा.सागर जाधव व सर्व सहकारी यांनी मा. अनिकेतभाऊ साळुंखे यांचे स्वागत केले.   यावेळी फकिरा पँथर सेना व अनिकेत भाऊ साळुंखे मित्रपरिवार तुमच्या कायम सोबत असेल अशी ग्वाही अनिकेत भाऊ साळुंखे यांनी दिली.

चिखलहोळ जि. प. प्राथ. शाळेच्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल यश.

Image
  चिखलहोळ जि. प. प्राथ. शाळेच्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल यश. विटा - प्रतिनिधी. जिल्हा परिषद शाळा चिखलहोळ,ता. खानापूर, जि. सांगली.या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सांगली,गुणवत्ता शोध परीक्षा 2025. या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलं. परीक्षा एकूण 100 गुणांची होती. यामध्ये मनस्वी अमित महामुनी (86), आदित्य योगेश जाधव (80), रक्षिता सचिन माने (78), शौर्य गणपत पाटील (74), वैष्णवी गोरख जाधव (72), अरहान कबीर मुजावर (62), श्रवण अजित गावडे (58), अहिर सरफराज शेख (56) विनिषा अजय जाधव (46), समीक्षा कुलदीप शिंदे (46), सुबहान  आर्षदआली मुलानी(40) या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केलं.त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलहोळ या शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले, यामध्ये श्री.गुरव सर, श्री.माने सर, श्रीमती माने मॅडम, श्रीमती वडगावकर मॅडम,  यांचे मार्गदर्शन मिळाले . विद्यार्थ्यांच्या या  यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत

Image
  सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक संपन्न. मुंबई, दि. 24 (गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट)  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मोठ्या धरणाच्या पाणलोट (कॅचमेन्ट) क्षेत्राबाहेरील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण करण्याचे व नवीन साठवण तलाव बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन – ‘मित्र’ या संस्थेच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार राणा जगजीतसिंह, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी आवश्यक धोरणे तयार करण...

मनरेगा अंतर्गत भूजल पातळी वाढीसाठी ५० हजार ‘जलतारा’ (शोषखड्डे) निर्माण करून आदर्श मॉडेल तयार करा.

Image
  मनरेगा अंतर्गत भूजल पातळी वाढीसाठी ५० हजार ‘जलतारा’ (शोषखड्डे)  निर्माण करून आदर्श मॉडेल तयार करा.  – जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रत्येक एक एकर शेतजमिनीत एक जलतारा (शोषखड्डा) निर्माण होणार  कोल्हापूर, दि. २५ एप्रिल : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जलतारा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी ५० हजार जलतारा निर्माण करून एक आदर्श मॉडेल तयार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुका प्रशासनाला दिले. गुरुवारी सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपजिल्हाधिकारी (रोहयो) शक्ती कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, ‘हे अकुशल स्वरूपाचे काम असल्याने शेतकरी स्वतः जॉबकार्ड काढून काम करू शकतात. प्रत्येक गावात किमान ५० शेतकरी सहभागी करून घ्या.’ बैठकीत जलतारा निर्मितीबाबत मार्गद...

प्रवीण साळुंखे यांची भाजपा कराड दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्षपदी निवड.

Image
  'आमदार डॉ.अतुलबाबांनी तरूण व निष्ठावंत कार्यकर्ताची ग्रामीण भागातून केली निवड'. प्रवीण साळुंखे यांची भाजपा कराड दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्षपदी निवड. उंडाळे -प्रतिनिधी. भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा मंडल अध्यक्ष पदाच्या निवडी संपन्न  झाल्या. भा ज पा कडून पक्षाची मोर्चेबांधणी मजबूत करण्यासाठी बूथ अध्यक्ष महत्वाचे असतात, त्याचबरोबर  मंडल अध्यक्ष यांचीही महत्त्वाची भूमिका असते.संपूर्ण राज्यभर मंडल अध्यक्षांची निवडी करण्यात आल्या. सातारा जिल्ह्यात  कराड दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्षपदी मा.प्रवीण शांताराम साळुंखे यांची निवड करण्यात आली.  तरूण व निष्ठावंत कार्यकर्ताची ग्रामीण भागातून कराड  दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ.अतुलबाबांनी निवड केलेबद्दल जनतेतून या निवडीबद्दल कौतुक होतंय. या मंडल अध्यक्ष निवडीतून कराड दक्षिण मतदारसंघात सामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवून आमदार आपली विचारधारा रूजवतील असा संकेत  दिसतोय.  या निवडीबद्दल मा.प्रवीण साळुंखे यांच अभिनंदन केलं जातंय. यात जेष्ठ मार्गदर्शक मा.प्रकाश पाटील (माजी चेअरमन वि.का.से.सो.साळशिरंबे.),प्रा.विनोद कांबळे (...

मेहता हॉस्पिटलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

Image
  आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापनास दिलेले प्रशिक्षण उपयुक्त  - जिल्हाधिकारी अशोक काकडे    मेहता हॉस्पिटलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न   सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : वैद्यकीय क्षेत्र हे आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अचानकपणे उद्‌भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापन सज्ज असणे आवश्यक असते. या अनुषंगाने अचानक उद्‌भवलेल्या आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापन व रूग्णालयात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे व्यक्त केला.   मेहता हॉस्पिटल येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शासकीय रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, डॉ. अजित मेहता, डॉ. पराग शहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक...

रुग्णांना दर्जेदार सेवा द्या - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Image
  रुग्णांना दर्जेदार सेवा द्या - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर. कोल्हापूर दि : 18 (जिमाका ) राज्य शासन धर्मदाय रुग्णालयांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करते. या धर्मदाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार व सौजन्यपूर्वक सेवा प्रदान करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले .         उद्यम नगरातील पंत वालावलकर रुग्णालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महालक्ष्मी हेल्थ फाऊंडेशनचे संतोष कुलकर्णी होते.        ते पुढे म्हणाले, धर्मदाय रुग्णालयांनी प्रथमतः रुग्णावरील उपचाराला प्राधान्य द्यावे तसेच आर्थिक कारणावरून रुग्णांची अडवणूक होता कामा नये. रुग्ण, हा डॉक्टरांमध्ये ईश्वराचा अंश पाहतो त्यामुळे डॉक्टरांनीही आपल्यावरील जबाबदारी ओळखावी. धर्मदाय रुग्णालयांनी आपला नावलौकिक कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन करून हे रुग्णालय जिल्हयातील रुग्णांच्या वैद्यकीय गरजा नक्कीच पूर्ण करेल अ...

पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.

Image
  पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. -पालकमंत्री शंभूराज देसाई. सातारा दि.17 (जि.मा.का.)पाटण तालुका हा निसर्गाने नटलेला तालुका आहे. हा तालुका डोंगरी असून जास्त करून येथील नागरिक शेती व पशुधनावर अवलंबून आहे. पर्यटन विभागाकडून येथील निसर्ग संपदेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल कालावधीत मरळी तालुका पाटण येथे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप कार्यक्रम पालकमंत्री श्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज देसाई आदी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, गृहराज्यमंत्री असताना पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या घरांच्या राहण्याचा प्रश्न सो...

अफसाना जमादार यांच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश.

Image
  अफसाना जमादार यांच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश. इस्लामपूर - प्रतिनिधी. अफसाना मोहसीन जमादार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अथक परिश्रम व इच्छा शक्तीच्या जोरावर यश संपादन केले. कर सहाय्यक व महसूल सहाय्यक या पदांवर त्यांची निवड झाली. त्यांना कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी इस्लामपूर या मार्गदर्शन केंद्राच सहकार्य लाभलं. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं कौतुक होतंय.

पोलिसांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न.

Image
  पोलिसांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती तसेच शासकीय वाहनांचे उदघाटन व लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 मध्ये येथील प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले होते आणि आज इथे सुसज्ज इमारती उभ्या आहेत. या इमारतींमुळे पोलीस बांधवांना 208 फ्लॅट उपलब्ध होत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ आणि महामंडळाच्या महासंचालक यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 24 तास कर्तव्य बजावूनदेखील पूर्वी पोलिसांना अतिशय वाईट अशा खोपट्यासारख्या घरांमध्ये राहण्याची वेळ येत होती. पण महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला पोलिसांसाठीची घरे बांधण्याचे काम दिले, तेव्हापासून ते चांगल्याप्रकारचे काम करत आहे. या माध्यमातून 2014 नंतर पोलिसांसाठी जास्तीतजास्त घरे बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यातून ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चिंचोली येथे साजरी.

Image
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चिंचोली येथे साजरी. शिराळा - प्रतिनिधी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती चिंचोली ता. शिराळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ग्रामपंचायत चिंचोली व भीमशक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मा. योगेश नाईक ग्रामविकास अधिकारी चिंचोली यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तींचे पुजन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.सुरेश जाधव हे  होते. कथाकार मा.सुनिल सकटे याचीही उपस्थिती होती. मी महात्मा जोतिराव फुले बोलतोय या एकपात्री प्रयोग निर्माते आयु.प्रदिप बनसोडे यांनी सविस्तर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन अशोक घोलप यांनी केले तर आभार अनिल सकटे यांनी मानले.

शाश्वत विकासासाठी दुर्मिळ खनिजांचा वापर व संवर्धन कराः प्रा.लक्ष्मीकांत दामा

Image
  शाश्वत विकासासाठी दुर्मिळ खनिजांचा वापर व संवर्धन कराः प्रा.लक्ष्मीकांत दामा  सोलापूर - प्रतिनिधी. शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण खनिजांचा योग्य वापर व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले. ‘One Earth, One Future: Integrating Sciences for Sustainability’ या संकल्पनेवर पी एम उषा अनुदान अंतर्गत दि. ११व १२ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन भूशास्त्र संकुलाच्या वतीने करण्यात आले होते. या परिषदेस युनिव्हर्सिटी ऑफ केलनिया (श्रीलंका) यांचे सहकार्य लाभले. उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. दामा यांनी शाश्वत विकासाच्या मूलभूत संकल्पना, भूशास्त्रातील बदलते आयाम आणि पर्यावरणविषयक जागरूकतेचा आलेख उलगडून दाखवला. या प्रसंगी व्यासपीठावर प्र-कुलसचिव डॉ. अतुल लकडे, संकुल संचालक डॉ. विनायक धुळप, डॉ. थारा प्रभाकरन उपस्थित होते. श्रीलंकेमधून प्रा. गुणथीलीका (अधिष्ठाता, सामाजिकशास्त्र) आणि प्रा. लाल मिरविन धर्मश्री यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. परिषदेती...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात महिला सक्षमीकरणावर व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात महिला सक्षमीकरणावर  व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे रुदाली सरमालकर यांचे महिला सक्षमीकरण या विषयावरती विद्यार्थिनींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  त्या सध्या वी आर मोअर सोलुशन लिमिटेड येथे गोल्ड डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यावेळी विद्यार्थिनींना आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, योग्य आहार कसा घेतला पाहिजे, तणावमुक्त कसे राहावे त्याचबरोबर मासिक पाळीत होणारा त्रास व घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील तसेच श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या  प्राचार्या  पुष्पा पाटील, वी आर मोअर सोलुशन लिमिटेडच्या सिल्वर डायरेक्टर अनघा सोरप, स्मिता धुमाळ, राहुल डिस्ट्रीब्यूटर व अन्वी सॉफ्टड्रिंक्सचे मालक अभिजीत पाटील उपस्थित होते.  यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी प्रमुख उपस्थितांचे स्वागत केले. य...

शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे डायलेसेस ची सुविधा उपलब्ध.

Image
  शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे डायलेसेस ची सुविधा उपलब्ध. शिराळा - प्रतिनिधी. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाली असून,शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे नवीन आठ डायलेसेस मशीन दाखल झाली आहेत. आज प्रत्यक्ष रुग्णालयास भेट देऊन  नवीन डायलेसेस मशीन ची पाहणी सन्माननीय आमदार मा. सत्यजित देशमुख यांनी केली. डायलेसेस करण्यात येत असलेल्या रुग्णाची भेट घेवून विचारपूस केली.शिराळा येथे डायलेसेस मशीन उपलब्ध झाल्याने गरीब, गरजू रुग्णाची सोय होणार असून त्यांचा वेळ,पैसा यांची बचत होणार आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यास यश आले. लवकरच एम.आर.आय मशीन व सि.टी.स्कॉन मशीन उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सामाजिक समता सप्ताह निमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन.

Image
  सामाजिक समता सप्ताह निमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन.   सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करणे व त्यांच्या सामाजिक कार्याविषयी व्याख्यान तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सांगली येथे करण्यात आले.  या कार्यक्रम प्रसंगी समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, संतोष कदम, वैष्णवी जाधव, तुषाल शिवशरण आदि उपस्थित होते.  यावेळी सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी महापुरूषांच्या विचारांचा दैनंदिन जीवनात वापर करुन समाजासाठी उपयोगी कार्य करण्याचा व स्वावलंबी बनण्याचे आवाहन करून कर्मवीर दादासाहेव गायकवाड सबळीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.   संतोष कदम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांविषयी लिहिलेल्या "शेतकऱ्याचा आसुड" या पुस्तकाचे स...

कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी मिळणार ४३ कोटी रुपये.

Image
  कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी मिळणार ४३ कोटी रुपये. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील कोल्हापूर सह 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट. कोल्हापूर, दि. 11 :- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई येथे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार मानले. या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे - कोल्हापूर सह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सोलापूर...

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा होणार लोकाभिमुख.

Image
  जलव्यवस्थापन कृती पंधरवडा होणार लोकाभिमुख. गोंडवाना न्यूज नेटवर्क:- जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा  विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिल्या. जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत 'जल व्यवस्थापन कृती पंधरवडा' साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजीव टाटू उपस्थित होते. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे सुधाकर देसाई यांचे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  देसाई यांनी तंबाखू सेवनामुळे मानसिक ताण वाढतो, चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक विकारांचे प्रमाण वाढू शकते तसेच कॅन्सर, हृदयविकार, श्वसनाच्या समस्या, त्वचारोग अशा अनेक समस्याने आपण ग्रासले जातो त्यामुळे अशा व्यसनापासून आपण दूर राहिले पाहिजे असे सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट  यांनी मानले.

ई-मंत्रिमंडळ – कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल.

Image
  ई-मंत्रिमंडळ – कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल. मुंबई, दि. १० – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून व डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाने नागरिक सेवा अधिक प्रभावीपणे डिजिटल स्वरूपात पुरवण्याचा संकल्प केला आहे. शासन व नागरिक यांच्यातील दुरावा कमी करून प्रशासन अधिक जवळ आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘ई-मंत्रिमंडळ’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पुढे नेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासनाचा पुढचा टप्पा ठरेल, अशी माहिती राज्य शासनामार्फत देण्यात आली आहे. महाराष्ट्राने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कागदविरहित (paperless) ई-गव्हर्नन्सच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. ‘ई-ऑफिस’, ‘सेंट्रल रजिस्ट्री युनिट’ (जे मंत्रालयातील सर्व पत्रव्यवहारांचे डिजिटायझेशन करते), ‘आपले सरकार’ व ‘जिल्हास्तरीय सुशासन निर्देशांक (DGGI)’ यांसारख्या अनेक अ‍ॅप्लिकेशन्स व प्रणालींमुळे ही प्रगती शक्य झाली आहे. याशिवाय, प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी लिपीक वर्गापासून ते मंत्र्यांपर्यं...

महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2025

Image
  महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2025. विविध विभागांनी समन्वयातून तयारी करावी -जिल्हाधिकारी संतोष पाटील  सातारा दि.10- महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव  2025 चे 2 ते 4 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला राज्यभरातून पर्यटक येणार असून कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.  महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा विश्रामगृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री.पाटील बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील अजित पाटील सोनाली मेटकरी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उत्सव कालावधीत पर्यटकांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता पोलीस विभागांनी घ्यावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, महाबळेश्वरला येण्यासाठी वाई, सातारा कोकणातून  रस्ते आहेत या रस्त्यांवरील कामे व महाबळेश्वर अंतर्गत रस्त्यांची कामे ...

सायन्स इंटरनॅशनल ऑलिम्पियाड परीक्षेत प्रगती मंडले चे नेत्रदीपक यश.

Image
  सायन्स  इंटरनॅशनल ऑलिम्पियाड  परीक्षेत प्रगती मंडले चे नेत्रदीपक यश. कोटा अकॅडमीच्या  विद्यार्थ्यांचा सायन्स इंटरनॅशनल  परीक्षेत डंका .    कराड - प्रतिनिधी.   आंतरराष्ट्रीय सायन्स ओलंपियाड  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला झाला असून कराड मधील कोटा  अकॅडमी व  कोटा जुनियर कॉलेजचा आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले ,यामध्ये   आठवीमध्ये शिकत असलेल्या प्रगती मंडले हिने  नेञदीपक यश संपादन  मिळवले.  या सह ,वैष्णवी शिंदे ,राजनंदनी कांबळे ,वैष्णवी जगताप यासह कोटाच्या अनेक विद्यार्थ्यांनी या  परीक्षेत  घवघवीत यश मिळवले.या यशाबद्दल कोटा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष  महेश खुस्पे   ,संचालिका मंजिरी  खुस्पे ,प्राचार्य जयश्री पवार, प्राचार्या सना संदे,आदींनी अभिनंदन केले .

सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने पशु पक्षांना अन्न पाण्याची व्यवस्था.

Image
  सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने पशु पक्षांना अन्न पाण्याची व्यवस्था. उंडाळे -प्रतिनिधी. पशु पक्षांना उन्हाळ्यात अन्न आणि पाणी मिळावे यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने भोंदवडे (सातारा) येथील आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना पशुपक्षांना पाणी ठेवण्यासाठी मातीच्या भांड्यांचे वितरण नुकतेच करण्यात आले.   भोंदवडे (सातारा) येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये येथे पार  पडलेल्या समारंभात पर्यावरण व निसर्ग संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुठभर धान्य, व पाणी या कार्यक्रमांतर्गत पशु पक्षांना पाणी व धान्य ठेवण्यासाठी मातीच्या भांड्यांचे वितरण करण्यात आले.अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे सुधीर विसापूरे , राज्य उपाध्यक्षा कांचन सावंत, मोहन कवळे, सहसचिव संजय गायकवाड, आहिल्यानगरचे जिल्हा संघटक चंद्रकांत भोजने, जिल्हाध्यक्ष नामदेव जगदाळे ,उपाध्यक्षा सौ. सविता बरांगळे, सचिव दयानंद पवार, सौ. प्रज्ञा पवार, जगन्नाथ माळी, संजय बारंगळे यांची यावेळी प्रम...

प्रणव खराडे याच्या उपकरणाची इन्स्पायर ॲवार्ड साठी निवड.

Image
  प्रणव खराडे याच्या उपकरणाची इन्स्पायर ॲवार्ड साठी निवड. कराड - प्रतिनिधी. सन 2024-25 च्या जिल्हास्तरीय इन्स्पायर ॲवार्ड प्रदर्शनाची निवड यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. यामध्ये फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज या शाळेतील प्रणव खराडे इयत्ता सातवी याच्या उपकरणाची  जिल्हास्तरीय प्रदर्शना साठी फलटण तालुक्यातून प्राथमिक शिक्षण विभागातून एकमेव निवड झाली . त्याला श्री सचिन पंडित सर यांचे मार्गदर्शन लाभले .या निवडी बद्दल जिल्हा इन्स्पायर ॲवार्ड समन्वयक श्री लक्ष्मण उबाळे ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजना चिरमे, सर्व शिक्षक तसेच काळज गावचे ग्रामस्थ , पालक,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुंबई येथे सायबर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

Image
  मुंबई येथे सायबर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. गोंडवाना न्यूज वृत्तसेवा. सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तपासात सायबर प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या.  डी. बी. नगर पोलीस स्टेशन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे  डी. बी. नगर पोलीस स्टेशन येथे उद्घाटन करण्यात आले.  यासोबतच मुंबई (मध्य) भागासाठी वरळी पोलीस स्टेशन येथील व मुंबई (पूर्व) भागासाठी गोवंडी पोलीस स्टेशन येथील सायबर प्रयोगशाळांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

सह्याद्री कारखाना निवडणुकीत 'पी. डी. पाटील पॅनलला सभासदांनी दिले स्पष्ट बहुमत.

Image
  सह्याद्री साखर  कारखाना निवडणुकीत पी. डी. पाटील पॅनलला स्पष्ट बहुमत.  कराड - प्रतिनिधी.  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'पी. डी. पाटील पॅनल'ने मोठा विजय मिळवत विरोधकांना आसमान दाखवले. दोन्ही फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर  तब्बल 8000 मतांच्या आघाडीने विजयी संपादन केला. या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सरासरी 7500 मते मिळाली, तर पी. डी. पाटील पॅनलने सरासरी 15500मते मिळवून स्पष्ट बहुमत सिद्ध करत आपली ताकद दाखवून दिली. निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि भाजप युवा मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलला केवळ 2250 मते मिळाली आहेत. ही निवडणूक परिसरात चांगलीच लक्षवेधी ठरली होती. राजकीय दृष्ट्या बहूचर्चित असलेल्या निवडणुकीत पी. डी. पाटील पॅनलचा बहुमताने विजय झाला या निकालाने सह्याद्रीत पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व मान्य केले आहे.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील दिक्षा साबळे व सायली गिरीगोसावी या विद्यार्थिनींनी कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव येथे घेण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनींचा स्पर्धेचा विषय रोल ऑफ फार्मासिस्ट इन मॅनेजिंग लाइफस्टाइल डिसिज हायपरटेन्शन असा होता. या विद्यार्थिनींचा सत्कार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व शिक्षक यांनी केला. प्रा. अरुणा परीट यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव, महाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव, महाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव, ता. कराड या महाविद्यालयाध्ये सन २०२४-२५ महाविद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांच्या निकालात उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी  विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक धोरण सांगून विद्यार्थ्यांना पुढे येणाऱ्या परीक्षाबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी व आभार प्रा. मोनिका शिंदे यांनी मानले.  या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा  डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.