Posts

Showing posts from July, 2025

वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन.

Image
  उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन. शिराळा - प्रतिनिधी. उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा व प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरूण इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, तपासणी ते उपचार बांधकाम कामगार योजना तसेच इतर शासकीय योजनेअंतर्गत रुग्णांची तपासणी उपचार व गरजेनुसार शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. तरी सर्व गरजू रुग्णांनी या मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं अहवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा व प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरूण इस्लामपूर यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे. हे शिबिर सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी सकाळी  9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरूण इस्लामपूर येथे संपन्न होणार आहे.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

Image
  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. मुंबई - प्रतिनिधी. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी "कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर" बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी  तर्फे आयोजन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय "कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर" आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना संघटन कौशल्य, समाजप्रबोधन, प्रचार तंत्रज्ञान, विचारप्रणाली आणि चळवळीतील भूमिका या बाबतीत प्रशिक्षित करणे आहे.या शिबिरात बी आर एस पी  चे राष्ट्रीय अध्यक्ष   ॲड. डॉ. सुरेश माने, तसेच इतर ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. चळवळीचे स्वरूप, राजकीय दिशा, तसेच सामाजिक न्यायाच्या लढ्यात कार्यकर्त्यांची भूमिका या विषयांवर सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. मार्गदर्शन शिबिर दि.  27 जुलै 2025 सकाळी 9 वाजता  पद्मशाली हॉल, बी जे देवरुखर मार्ग, नायगाव, दादर पूर्व, मुंबई येथे ...

कराड R.T.O. च्या कामगिरीला फकिरा पँथर सेनेचा सलाम.

Image
    कराड आर.टी.ओ च्या  कामगिरीला फकिरा पँथर सेनेचा सलाम. कराड - प्रतिनिधी.   फकीरा पॅंथर सेनेच्या वतीने कराड  आर.टी.ओ.   अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. कराड येथे R.T.O. कार्यालय मध्ये कामानिमित्त फकिरा पॅंथर सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अनिकेत भाऊ साळुंखे गेले असता एक प्रसंग अनुभवला.आर.टी.ओ. कार्यालय आवारात एक दिव्यांग व्यक्ती त्यांच्या कामानिमित्त आले होते. त्यांचे सदरचे काम दुसऱ्या मजल्यावर असावे. परंतु त्यांची अधिकाऱ्यांना माहिती मिळताच महिला अधिकारी  क्षणाचा विलंब न करता  मदतीला धावत तळमजल्यावर आल्या व त्यांचा प्रश्न मार्गी लावला. अधिकारी आपल्या भूमिका जबाबदारीने पार पाडत असतात. आज खऱ्या अर्थाने सुदृढ लोकशाहीचं दर्शन मला घडलं. नागरिकांनीही त्यांच्या कार्याचं  कौतुक केलं पाहिजे. कराड  आर.टी.ओ.   चे काम सुद्धा अभिमानास्पद वाटलं अस मत फकीरा पॅंथर सेनेचे प्रदेश अध्यक्ष अनिकेतभाऊ साळुंखे यांनी व्यक्त केले. आम्ही या मानसिकतेला  फकिरा पॅंथर सेनेच्या वतीने आपले धन्यवाद करतो आणि आपल्या अश्...

मलकापूरमध्ये आरोग्य शिबिर संपन्न.

Image
  मलकापूरमध्ये आरोग्य शिबिर संपन्न.     तानाजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन. कराड - प्रतिनिधी. महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातुन कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले यांच्या विशेष सहकार्यातुन मलकापूरचे सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले. यामध्ये शहर व परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगार  व त्यांच्या कुटूंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी वेगवेगळ्या २४ वैधकीय चाचण्या करण्यात आल्या. सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा या घोषवाक्याप्रमाणे आरोग्य शिबिरामधून बांधकाम कामगार क्षेञात काम करणार्‍या कष्टकरी कुटूबियांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. या उपक्रमामुळे कामगार व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक भाराविना वैधकीय सुविधा मिळणार असुन समाजाच्या आरोग्याविषयक गरजांबाबत समयसुचकता व काळजी व्यक्त करणारा उपक्रम यशस्वीपणे पार ...

महिला महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न.

Image
  महिला महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न. कराड -  प्रतिनिधी. शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड येथे रोजगार मेळावा मंगळवार दि. 22/07/2025 रोजी  उत्साहात संपन्न झाला.  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा आणि शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा महिला महाविद्यालयात उमेदवारांच्या भरघोस प्रतिसादाने संपन्न झाला.  यावेळी  नामांकित कंपनीमध्ये उमेदवारांच्या मुलाखती द्वारे निवडी करण्यात आल्या. या मेळाव्याद्वारे बेरोजगार युवक युवतीना रोजगार उपलब्ध झाला. महिला महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी मा.सुनिल पवार  सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग सातारा, डॉ. अनिल हुद्देदार. अध्यक्ष शिक्षण मंडळ कराड, मा.बाळासाहेब कुलकर्णी चेअरमन शिक्षण मंडळ कराड, मा. चंद्रशेखर  देशपांडे सचिव शिक्षण मंडळ कराड, मा. उदय थोरात. कौन्सिल सदस्य शिक्षण म...

सद्गगुरु बाबा महाराज विद्यालय मधील विद्यार्थ्यांनी तयार केले सिड्सबॉल.

Image
  सद्गगुरु बाबा महाराज विद्यालय मधील विद्यार्थ्यांनी तयार केले सिड्सबॉल. उंडाळे -प्रतिनिधी.          रयत शिक्षण संस्थेच्या सद्गगुरु बाबा महाराज विद्यालय, सवादे ता.कराड मध्ये प्रत्येक वेळेला नाविन्यपूर्ण  उपक्रम घेतले जातात या उपक्रमात विद्यार्थी  भाग घेतात त्यातीलच एक उपक्रम म्हणजे सीड्स बॉल (बीज गोळे) तयार करणे . विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन करण्याची त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावे या हेतूने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दरेकर उषा यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली मुलांना आवाहन केले आणि बघता बघता जवळपास आठ हजार सिड्स बॉल विद्यार्थ्यांकडून तयार झाले. ते फेकण्यासाठी जवळच असणाऱ्या लटकेवाडी चा डोंगर व आजूबाजूचा परिसर याची निवड करण्यात आली. या उपक्रमांतर्गत मुलांना वर्षा सहलीचा आन॑द देखील मिळाला याप्रसंगी शिक्षक संतोष जाधव, मानसिंग पवार, अभिजीत देशमुख, श्याम सुतार, चंद्रकांत वाघमारे,विजया थोरात,पुष्पा साठे उपस्थित होते.  उपक्रमाची साऺगता मुलांमध्ये असणाऱ्या विविध कलागुणांच्या सादरीक...

आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या तत्परतेने धोकादायक विजेचे खांब हटविले.

Image
  आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या तत्परतेने धोकादायक विजेचे खांब हटविले. उंडाळे -प्रतिनिधी. महारुगडेवाडी ( ता.कराड.) येथील धोकादायक पोलची माहिती भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष मा.प्रविण साळुंखे व ग्रामस्थ यांचे मार्फत मिळाली .पोल पुर्ण जिर्ण झालेला होता, झाडामध्ये अडकलेला होता,या पोलच्या बाजुने जिंती-उंडाळे जाणारा रस्ता आहे.या डांबावरुन तीन ठिकाणी लाईटचा विस्तार झाला आहे. गावातील घरावरती पडण्याची भिती वर्तवली जात होती.या पोल मुळे गावात भितीचे वातावरण होते कार्यतत्पर आमदार डॉ.अतुलबाबा यांनी यांची दखल घेत लगेच MSEB विभागाशी संपर्क करुन, हा पोल  बदलण्याचे आदेश देण्यात आले. या बदललेल्या पोल मुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महारुगडेवाडी गावातील ग्रामस्थांच्या वतीने मा.आमदार अतुलबाबाचे विशेष आभार मानण्यात आले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सवात संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सवात संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.  गुरु विषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. म्हणून या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयांमध्ये प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिप प्रज्वलनाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांनी गुरुचे महत्त्व सांगताना गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, गुरु आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतात ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात आणि आपले जीवन घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. गुरुपौर्णिमा हा गुरुप्रती आदर आणि प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून हा एक दिवसाचा कार्यक्रम न करता तो दैनंदिन जीवनात कायम असावा असे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी प्रा. प्रियांका माळी व विद्यार्थ्यांच्यामधून दीक्षा स...

दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड विशेष मोहीम राबवणार .

Image
  दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड विशेष मोहीम राबवणार - जिल्हाधिकारी अशोक काकडे    सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : दिव्यांग नागरिकांना शारीरिक, बौद्धिक, मानसिक मर्यादा असल्या तरी ते समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत. या अनुषंगाने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे पुनर्वसन आवश्यक आहे. त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या युडीआयडीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात यासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, we फाऊंडेशन पुणे सीईओ दिनेश कदम, जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, यांच्यासह मूकबधीर शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी आदि उपस्थित होते.  आतापर्यंत नोंदणी झालेल्या दिव्यांगांना युडीआयडी देण्यासाठी महिनाभरात विशेष मोहीम हाती घ्...

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश परिषदेवर संजय पवार व हर्षवर्धन मोहितेंची निवड

Image
  भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश परिषदेवर संजय पवार व हर्षवर्धन मोहितेंची निवड.   कराड - प्रतिनिधी. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश परिषदेवर कराड तालुक्यातील रेठरे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार व बेलवडे बु येथील कृष्णा सहकारी बॅकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते यांची निवड झाली. संजय पवार ,हर्षवर्धन मोहिते हे भा.ज.पा जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांचे निष्ठावंत विश्वासु कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीने सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्या वतीने मलकापूर येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पदाधिकारी सुनिल शिंदे, शंकर पाटील, विस्तारक धनाजी माने,मध्यमंडलचे राजेंद्र यादव, पूर्वचे शंकर निकम, पश्चिमचे दत्तात्रय साळुंखे,सुरज शेवाळे,तानाजी देशमुख,शहाजी पाटील, सुर्यकांत खिलारे,कृष्णत तुपे,बापुराव थोरात, वसिम मुल्ला, रुपेश देसाई, श्रीकांत दमामे,याच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले, मंञी शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंञी जयकुमार गो...

शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील - जिल्हाधिकारी अशोक काकडे

Image
  शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील - जिल्हाधिकारी अशोक काकडे   सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : शिराळा तालुक्याची निसर्ग संपदा समृद्ध असून, याठिकाणी पर्यटनास मोठा वाव आहे. पर्यटन वाढवून स्थानिकांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने रोजगारवृद्धीसाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.  शिराळा तालुक्याच्या पर्यटनवाढीच्या अनुषंगाने शिराळा येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, चांदोली वन्यजीवच्या प्रकल्प उपसंचालक स्नेहलता पाटील, तहसीलदार शामला खोत पाटील, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, अमित भिसे, उपविभागीय अभियंता बाबासाहेब पाटील, ऋषिकेश पाटील, सुदामा कुंभार आदि उपस्थित होते. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी काकडे यांनी चांदोली व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण, शिराळा येथील भुईकोट किल्ला याची पाहणी केली. यावेळी महसूल, वनविभाग, पाटबंधारे विभाग आदि विभागांचे अधिकारी सोबत होते.   जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शिराळ्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी शासन व खाजगी उद्योजक यांच्या एकत्रित गुंत...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे प्रवीण बनसाली यांचे अन्न रसायनशास्त्र या  विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  सध्या ते अलायन्स युनिव्हर्सिटी बेंगलोर येथे प्राध्यापक आहेत. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दैनंदिन जीवनात स्वयंपाक करताना आपण जे नॉनस्टिक भांडी वापरतो त्यामध्ये टॅफलोन हे पॉलीमर असते जे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. तसेच आपण जे प्लॅस्टिक प्लेट्समधून गरम अन्न खातो त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो त्यामुळे  प्लॅस्टिकचा वापर टाळावा अशा प्रकारे मार्गदर्शन केले.  यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. पूजा भोसले व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी केले.

अर्थसाक्षरता काळाची गरज - प्राचार्य डॉ सतिश घाटगे.

Image
  अर्थसाक्षरता काळाची गरज - प्राचार्य डॉ सतिश घाटगे.   कराड - प्रतिनिधी. शिक्षण मंडळ,कराड संचालित महिला महाविद्यालय कराड येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ६ जुलै थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. वि.म.दांडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून “अर्थजागृती” सदराचे उद्घाटन एस.बी. एस कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतिश घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पराग सोनटक्के होते.     आपले विचार व्यक्त करताना प्राचार्य डॉ.घाटगे म्हणाले की,प्रत्येकाने अर्थसाक्षर झाले पाहिजे जेणेकरून देशांमध्ये आर्थिक लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल.        अर्थजागृती सदरामुळे विद्यार्थिनींना अर्थशास्त्रीय संज्ञा, संकल्पना,आर्थिक घडामोडी यांचे ज्ञान मिळेल हा एक आदर्श उपक्रम आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.बी.बी.बल्लाळ यांच्या प्रेरणेतून सदर उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी प्रो.डॉ.एस.आर.प्रभुणे,प्रो.डॉ.यु.एन.ताठे,डॉ.ए.व्ही.शिंदे, प्रा.व्ही.एस.सुर्वे,डॉ.पी.व्ही.मिसाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.व्ही.एस सागरे सू...

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द.

Image
  राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द.    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत              घोषणा.    आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार.      ५० लाख कुटुंबांना लाभ. मुंबई, दि.९ : राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित होती. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाण पासून २०० मीटर पर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एक गुंठेपर्यंत जमिन व्यवहारासाठी तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत केली. याबाबतची अधिकची माहिती देताना मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १५ दिवसात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख कुटुंबांना जमीन व्यवहाराचा फायदा होणार आहे. १ जानेवारी २०२५ नंतर अशा व्यवहारांमध्ये प...

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविण्यासाठी शिबीरांचे आयोजन.

Image
  दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविण्यासाठी शिबीरांचे आयोजन. सातारा दि. 9:  केंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत्त अलिम्को या शासनमान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा जिल्हयात ऑन द स्पॉट निःशुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे प्रत्येक तालुक्याच्या गट विकास अधिकारी कार्यालयात आयोजन  करण्यात येणार आहे.  तज्ञ  पथकाकडून दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्स मोजमाप घेऊन जाग्यावरच वितरण करणार आहेत. या शिबीराचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे. शिबीरांचे आयोजन पुढील प्रमाणे पंचायत समिती, सातारा व जावली २१ जुलै,  पंचायत समिती, वाई व खंडाळा २२ जुलै,    पंचायत समिती, फलटण २३ जुलै,   पंचायत समिती, कोरेगाव २४ जुलै, पंचायत समिती, माण व खटाव २५ जुलै,   पंचायत समिती, महाबळेश्वर २६ जुलै ,   पंचायत समिती, पाटण २८ जुलै  व  पंचायत समिती, कराड ३० जुलै या ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ.

Image
    व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध आरक्षण प्रवर्गांतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्युएस/एनसीएल/सीव्हीसी/टीव्हीसी (EWS/NCL/CVC/TVC) बाबतची मूळ प्रमाणपत्रे अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक करत होते. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, ज्यांची तारीख 8 जुलै 2025 होती. ती आता 11 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. यानंतरही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर (एससी,एसटी वगळून) करण्यासाठी...

सद्गुरु बाबा महाराज विद्यालय सवादे येथे दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

Image
  सद्गुरु बाबा महाराज विद्यालय सवादे  येथे दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. उंडाळे -प्रतिनिधी.  रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु बाबा महाराज विद्यालय सवादे तालुका कराड येथे एस.एस.सी बॅच 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यानींचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यामध्ये विद्यालयात प्रथम आकांक्षा येडूदेव साठे 90% द्वितीय हर्षाली आनंदा पाटील 89% तृतीय नेहा गणेश बांदेकर 87 40% यांचा सत्कार करण्यात आला          कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी सदस्य मा. श्री. वसंतराव चव्हाण संस्थापक राहुल उद्योग समूह हे होते  . कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. प्राचार्या डॉ.वैशाली पाटील यांनी मुलांचा सत्कार रोख रक्कम व भेटवस्तू देऊन केला. याप्रसंगी त्यांनी मुलांना भविष्यातील संधी कोणत्या आहेत याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका दरेकर उषा रंगराव यांनी केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यानी भविष्याचा वेध घेऊन पुढील शिक्षणाची निवड करावी असे सांगितले. याप्रसंगी श्र...

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये अनुगामी लोकराज्य महाअभियान मार्फत अनुलोम गुरुगौरव कार्यक्रम संपन्न.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये अनुगामी लोकराज्य महाअभियान मार्फत अनुलोम गुरुगौरव  कार्यक्रम संपन्न. शिराळा - प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये अनुगामी लोकराज्य महाअभियान मार्फत अनुलोम गुरुगौरव  कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनुगामी लोकराज्य महाअभियान, महाराष्ट्र राज्य सांगली -कोल्हापूर जिल्हा प्रमुख जनसेवक मा. प्रशांत कुंभार , अनुलोम मित्र मा. सागर गायकवाड साहेब, व  मा. विलास पाटील  या मान्यवरांच्या उपस्थितीत अनुलोम गुरुगौरव कार्यक्रम संपन्न झाला. तर कार्यक्रम अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. सी. सदावर्ते  होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. ए.आर पाटील -साळुंखे  यांनी केले. अध्यक्ष निवड व्ही. डी. पाटील  यांनी केली तर अनुमोदन सौ. एस. ए.पाटील   यांनी दिले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मा. मुख्याध्यापक ए. सी.सदावर्ते यांनी केले. जनसेवक मा. प्रशांत कुंभार , अनुलोम मित्र मा. सागर गायकवाड , व  मा. विलास पाटील  आदिंच्या शुभहस्ते विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्...

चांदोली धरणाचे दरवाजे उघडलेः नदिकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा.

Image
चांदोली धरणाचे दरवाजे उघडलेः नदिकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा. शिराळा -प्रतिनिधी. चांदोली धरणक्षेत्रात पडणार्‍या  पावसाचा जोर कायम असल्यामूळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत  असुन धरणाची पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी आज  दुपारी साडेबारा   वाजता चांदोली धरणाचे  चारीही वक्राकार  दरवाजे ०.५०    मीटरने उचलुन  धरणाच्या सांडव्यातुन  वारणानदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यास  प्रारंभ करण्यात आला. सध्या धरणाच्या चारीही वक्राकार दरवाजातुन २८७० क्युसेक्स तर वीजनीर्मिती केंद्रातुन १६३० क्युसेक्स पाणी वारणानदीपात्रात सोडडण्यात आल्याने वारणानदिचे पाणी पात्राबाहेर पडले असुन चांदोली धरण प्रशासनाकडुन नदिकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोली परीसरात पडणार्‍या पावसाचा जोर कायम असल्यामुळे  या परीसरात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे  धरणाच्या पाणलोटक्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात  पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.सध्या धरणाची पाणी पातळी ६१९.२० मीटर इतकी आहे. तर धरणात सध्या २७ टि.एम सी म...

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आयुक्तांना निवेदन.

Image
  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आयुक्तांना निवेदन . मुंबई - प्रतिनिधी. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आयुक्तांना दिलेले निवेदन.चेंबूर विधानसभा अंतर्गत प्रभाग १५०, १५२ व १५३ मधील नागरी समस्यांबाबत आयुक्तांना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे निवेदन चेंबूर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५०, १५२ व १५३ मधील नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. यामध्ये विशेषतः रस्त्यांवर साचणारे पाणी, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आणि नाल्यांची नियमित साफसफाई न होणे यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या मुंबई अध्यक्ष दिपक चौगुले सहित शिष्टमंडळाने दिनांक 07 जुलै 2025 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.पावसाळ्याच्या काळात नालेसफाई न झाल्यामुळे रस्ते जलमय होत असून, वाहतूक व दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था ही...

विधानपरिषद कामकाज

Image
  विधानपरिषद कामकाज. चंद्रपूर परिसरातील औष्णिक विद्युत केंद्र, कोळसा खाणी व स्टील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नावर शासन जागरूक असून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली. चंद्रपूर परिसर २०१० मध्ये "क्रिटिकली पॉल्युटेड एरिया" (CPA) म्हणून नोंदवलेला होता, मात्र विविध उपायांमुळे प्रदूषण निर्देशांक ८३ वरून ५४ वर आला आहे. यामुळे काही उद्योगांना अटींवर परवानग्या देण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी उद्योगांना ईएसपी (इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर), डस्ट कलेक्टर, ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम, जलप्रदूषण नियंत्रणासाठी ट्रीटमेंट प्लांट, पाण्याचा पुनर्वापर, रस्त्यांचे पक्कीकरण व फवारणीसारख्या अटी बंधनकारक करण्यात आल्या असल्याचेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.  शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवित आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घे...

नवीन रास्तभाव दुकांनासाठी 30 जुलैपर्यंत अर्ज करावेत.

Image
  नवीन रास्तभाव दुकांनासाठी 30 जुलैपर्यंत अर्ज करावेत. ___जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने सातारा दि. 1 : सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने  मंजूर करण्यात आली आहे. या दुकानांसाठी इच्छुकांनी 30 जुलैपर्यंत अर्ज संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.  यामध्ये सातारा तालुका गावे ८  व शहरी ठिकाणे ०३, वाई तालुका - गावे-१५, कराड तालुका गावे- ६, महाबळेश्वर तालुका-४४, कोरेगाव तालुका -१३, खटाव तालुका-१०, फलटण तालुका ४, पाटण तालुका-१९,  माण तालुका- ४, खंडाळा तालुका-७, जावली तालुका- ८ अशा एकूण १४१ गावे  ठिकाणांचा समावेश आहे.    तरी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरीता...

जिल्हा परिषद शाळा, पाचगणी येथे माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Image
  जिल्हा परिषद शाळा, पाचगणी येथे माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप. शिराळा -प्रतिनिधी. पाचगणी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा, पाचगणी येथे माजी विद्यार्थी श्री. अजित शंकर चव्हाण,श्री .शंकर रघुनाथ पाटील,श्री.अनिल बाळकृष्ण पाटील, सौ. अंजना सुधीर   पाटील गाव (काळगाव)  यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमात इयत्ता १ ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना  स्कूल बॅग्स व छत्री इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सरपंच सौ.दिपाली संदिप पाटील, सौ.शर्मिला अमोल इनामदार, श्री. रघुनाथ शंकर  पाटील, श्री. पांडुरंग शंकर  पाटील, श्री. अशोक श्रीपती चव्हाण, श्री.जगन्नाथ यशवंत  पाटील, संदिप पाटील, राम पाटील, अमोल इनामदार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवी काळबांडे, हुमणे सर, कृष्णा कांबळे,   शिक्षकवृंद , पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दलच्या आठवणी शेअर करत विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास व प्रगतीचा सल्ला दिला. “या शाळेन...

शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याचे आवाहन.

Image
  शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याचे आवाहन.         सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप, छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व निर्वाह भत्ता या योजनांचे अर्ज दि. 30 जून 2025 पासून https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचे अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. सन 2023-24 मधील प्रलंबित असलेले Re-Apply टॅब उपलब्ध करून दिलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रलंबित विद्यार्थ्यांनी या योजनांचे अर्ज दि. 31 जुलै 2025 पर्यंत भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.   सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील नवीन व नूतनीकरण प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अटी व शर्ती...