बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आयुक्तांना निवेदन.

 बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आयुक्तांना निवेदन.

मुंबई - प्रतिनिधी.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आयुक्तांना दिलेले निवेदन.चेंबूर विधानसभा अंतर्गत प्रभाग १५०, १५२ व १५३ मधील नागरी समस्यांबाबत आयुक्तांना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे निवेदन चेंबूर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५०, १५२ व १५३ मधील नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. यामध्ये विशेषतः रस्त्यांवर साचणारे पाणी, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आणि नाल्यांची नियमित साफसफाई न होणे यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या मुंबई अध्यक्ष दिपक चौगुले सहित शिष्टमंडळाने दिनांक 07 जुलै 2025 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.पावसाळ्याच्या काळात नालेसफाई न झाल्यामुळे रस्ते जलमय होत असून, वाहतूक व दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था ही महिलांसह सर्वच नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीची बाब आहे. पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात प्रभागातील पायाभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी सतेश मस्के, राजाराम आढाव, शशिकांत सोनावणे, शरद पवार, प्रशांत आढाव, अरुण बनसोडे, अमर भंडारे आदी सहकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .